उमरखेड शहरात ‘ महाराजांच्या ‘ पुतळ्याला घेवुन घमासान !
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन पुन्हा आंदोलने झालीत. पुर्वनियोजीत जागेतच महाराजांचा पुतळा व्हावा यासाठी शिवसृष्टी स्मारक समीतीने शेकडो कार्यकर्त्यांची बैठक घेवुन मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांना निवेदन दिले तर अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने गांधी चौक व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काही कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौकातच पुतळा करण्यात यावा यासाठी घंटानाद आंदोलन केले. शहरातील नागरिकांत दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने शहरात विविध चर्चेला उधान आले आहे.
आज दुपारी १२ वाजता शिवसृष्टी स्मारक समीतीने स्थानिक राजस्थानी भवन येथे उमरखेड तालूक्यातील नागरिकांची बैठक घेतली . या बैठकीला समीतीचे अध्यक्ष अँड. संजय जाधव , न . पा . माजी उपाध्यक्ष नितीन माहेश्वरी , जीजाऊ ब्रिगेड जील्हाध्यक्ष सरोज देशमुख , शिवाजी माने , नगरसेवक अमोल तीवरंगकर यांनी संबोधीत केले . यावेळी शासनाने अटी व शर्थी मंजूर केलेल्या शहरातील जुन्या सेंट्रल नाक्याच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शासनाच्या नियमानुसारच होवु शकतो अन्यथा इतरत्र पुतळा होणे नाही . यासाठी महाराजांच्या पुतळ्यासाठी न . पा . ला प्राप्त झालेला निधी परत जावू शकतो अन्यथा यानंतर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणे शक्य नसल्याचे सांगून पुतळा शहरात कुठेही व्हावा हा बैठकीतला निर्णय घेवुन समीतिने मुख्याधिकारी इंगुले यांना याबाबत निवेदन दिले .
तर दुपारी एक वाजता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समीतीने गांधी चौकात घंटानाद आंदोलन करीत पुतळा शिवाजी महाराज चौकातच झाला पाहीजे यासाठी आंदोलन सुरू केले . यावेळी संघर्ष समिती सोबत शिवसेनेचा पाठींबा दिसून आला त्यामुळे पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला … यानंतर हेच आंदोलन डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संघर्ष समीतीने करून प्रशासनाचे लक्ष वेधले
शिवसृष्टी स्मारक समीती बैठकीत बोलतांना मा.न.पा.उपाध्यक्ष नितीन माहेश्वरी