राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस , निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई – संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जबरदस्त खडाजंगी सुरू असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. ही नोटीस, गेल्या निवडणुकांत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात आहे.
याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे यांनाही आयकर विभाग नोटीस धाडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मंगळवारी शरद पवार यांना विचारले असता, ‘आपल्यावर प्रेम असल्याने आनंद आहे.
पहिल्यांदाच मला नोटीस आली, सुप्रिया यांना येणार असल्याचे समजते. चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा आनंद आहे’, असे पवार म्हणाले.
‘मला सोमवारी नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून ही नोटीस आली आहे. त्याचे उत्तर आपण लवकरच देऊ. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांसंदर्भात ही नोटीस आहे,’ असेही शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सध्या भाजपा आणि राज्य सरकार यांच्यात तणावाचे वातावरण आहे. अशातच आयकर विभागाचे नोटीस प्रकरण समोर आले आहे. आयकर विभागाकडून या नोटिशीत निवडणूक काळात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती मागवली आहे
पवारांचा उपवास –
संसदेत नुकतीच कृषी विधेयके मंजूर झाली. या विधेयकांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत आहे. आजच यासंदर्भात शरद पवारांनी एक दिवसाचा उपवास ठेवणार असल्याचे म्हटले होते, अशातच या नोटिशीचे वृत्त आले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….