उमरखेड शहरात जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याची धाड ३ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
उमरखेड शहरातील जुन्या वस्तीत अनेक दिवसापासुन सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने धाड टाकून जुगार खेळत असलेल्या पंधरा जणांना अटक केली असून ३ लाख १७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यवाही मुळे उमरखेड पोलिस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उमरखेड शहरातील आठवडी बाजार परिसरात गोचर स्वामी वार्डात बंटी उर्फ स्वप्नील सुभाष श्रीवास्तव यांचे घरी जुगार सुरु असल्याच्या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाने धाड टाकून पंधरा जुगाऱ्यांना अटक केली तर त्यांचेकडून रोख ९० हजार आठशे वीस रुपये ,३ मोटर सायकल रुपये १ लाख २५ हजार व १२ मोबाईल रुपये १ लाख दोन हजार असा ३ लाख १७ हजार आठसे विस रुपयाचा एकूण मुद्देमाल जप्त केला आहे .
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यां आरोपींमध्ये बंटी उर्फ स्वप्निल सुभाष श्रीवास्तव रा. गोचर स्वामी वार्ड, विलास प्रकाश भांडवले रा .इंदिरानगर ,नंदकिशोर वामनराव देवसरकर रा. देवसरी, कृष्णा संभाजीराव शिंदे रा. करोडी, संजय बालाप्रसाद श्रीवास्तव रा. सिद्धेश्वर नगर, परमेश्वर ग्यानबा कणेवार रा . सोईट महागाव ,आसिफ खान अनिस अहमद खान रा. सराफा लाईन गजानन पांडुरंग काटे रा . चालगणी ,अर्जुन शामराव वानखेडे रा .राजेंद्र प्रसाद वार्ड ,देवराव उत्तमराव शिंदे रा. करोडी ,तुकाराम शामराव शिंदे रा. करोडी ,संतोष नामदेव गायकवाड रा. ढाणकी , नारायण किसन दुधे रा . बाळदी , ग्यानबा बंडू वानखेडे रा .लिंबगव्हाण यांना अटक करण्यात आली
या कार्यवाहीत उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश घुगे ,शेख वसीम ,उमेश चव्हाण ,युनुस भातमासे ,सुनील केंद्रे ,कोमल पवार ,रवी कपिले ,हनुमंत मुसळे, देवेंद्र होले ,अविनाश शहारे ,राजपाल राठोड, आकाश जाधव ,प्रवीण राठोड ,लखन कैतवास ,प्रीती बावनकुळे ,पूनम बावनकुळे ,राखी शिरसाट, अलका बोरकर ,अश्विनी सूर्यवंशी यांनी पार पाडली . पि एस आय महेश घुगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुध्द कलम ४ , ५ सहकलम १८८ , २६९ , २७१ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .