24 तासात 830 जण कोरोनामुक्त,नऊ जणांचा मृत्यु;221 नव्याने पॉझेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 20 :
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा वाढत असला तरी बरे होणा-या रुग्णांच्या संख्येतसुध्दा लक्षणीय वाढ होत आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 830 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही जिल्ह्यासाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 221 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
मृत झालेल्या नऊ जणांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला, 81, 63 आणि 72 वर्षीय पुरुष, वणी शहरातील 53 आणि 70 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 50 वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील 60 वर्षीय पुरुष आणि कळंब तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 221 जणांमध्ये 137 पुरुष व 84 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 46 पुरुष व 30 महिला तसेच तालुक्यातील चार पुरुष, दारव्हा शहरातील नऊ पुरुष व चार महिला तसेच तालुक्यातील दोन पुरुष, वणी शहरातील चार पुरुष व तालुक्यातील दोन पुरुष, महागाव शहरातील सात पुरुष व चार महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील 10 पुरुष व आठ महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, बाभुळगाव शहरातील एक तसेच तालुक्यातील एक पुरुष, नेर शहरातील दोन पुरुष व पाच महिला तसेच तालुक्यातील एक महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, पुसद शहरातील 14 पुरुष व आठ महिला तसेच तालुक्यातील एक पुरुष, घाटंजी शहरातील सहा पुरुष व एक महिला, कळंब शहरातील सात पुरुष व तीन महिला, आर्णि शहरातील 10 पुरुष व सात महिला तसेच तालुक्यातील दोन पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष व सहा महिला, मारेगाव शहरातील तीन पुरुष व तीन महिला पॉझेटिव्ह आले आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 639 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 478 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 7156 झाली आहे. यापैकी 5835 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 204 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 285 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 67514 नमुने पाठविले असून यापैकी 66111 प्राप्त तर 1403 अप्राप्त आहेत. तसेच 58955 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..