बेपत्ता इसमाचे प्रेत आढळले;दोन दिवसापूर्वी झाला होता बेपत्ता
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
दोन दिवसा पासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज सार्वजनिक पाणीपुरवठा च्या विहरीत आढळून आल्याने ढाणकीत खळबळ माजली आहे.
ढाणकी टेम्भेश्वर नगर येथील रहिवासी शंकर गंगाराम भूमीनवाड वय 44 वर्ष असे मृतकाचे नाव आहे. सदर इसम हा दि. 14 सप्टेंबर रोजी घरी शुल्लक कारणा वरून भांडण करून घरातून निघून गेलेला होता.आज दुपारी मात्र त्या इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आला. सदर मृतदेह विहिरीत तरंगत असताना काही नागरिकांना दिसला होता त्यांनी ही बाब पोलिसांना ग्रामस्थांनी कळविले. ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिटरगांव पोलीस स्टेशनं येथे काल तक्रार नोंदवण्यात आली होती. सदर घटनेचा तपास ठाणेदार विजय चव्हाण यांचे मार्गदर्शनात पो कॉ संदीप राठोड, निलेश भालेराव करत आहेत.