जिल्ह्यात गत 24 तासात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 240 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर
आतापर्यंत एकूण 4391 जणांना सुट्टी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 16 :
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा पुन्हा वाढला असून गत 24 तासात जिल्ह्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे तर 240 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 4391 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मृत झालेल्या 11 जणांमध्ये यवतमाळ शहरातील 72 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरूष, 75 वर्षीय पुरूष, 52 वर्षीय पुरूष व 60 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 57 वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील 65 वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील 55 वर्षीय पुरूष, महागाव तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील 60 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 240 जणांमध्ये 140 पुरुष व 100 महिला आहेत. यात आर्णी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, बाभूळगाव शहरातील 12 पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन पुरूष, दिग्रस शहरातील सात पुरूष व सहा महिला, घाटंजी शहरातील आठ पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील तीन पुरूष व सहा महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील दोन पुरुष व सात महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरूष, मारेगाव शहरातील चार पुरुष व तीन महिला, नेर शहरातील सात पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील 10 पुरूष व 10 महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, वणी शहरातील 28 पुरुष व 23 महिला, वणी तालुक्यातील दोन पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील 41 पुरुष व 29 महिला, तसेच यवतमाळ तालुक्यातील एक महिलेचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1603 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 224 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 6393 झाली आहे. यापैकी 4391 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 175 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 281 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 63964 नमुने पाठविले असून यापैकी 62733 प्राप्त तर 1231 अप्राप्त आहेत. तसेच 56340 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..