“आधी मुख्यमंत्री होतो का मंत्री होतो..?” आमदार बच्चू कडू यांचा सवाल…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना आम्ही स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांना पाठिंबा दिला. आमच्या पाठिंब्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतरच मंत्रीपद दिले गेले. उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते असूनही आधी मुख्यमंत्री होतो का होतो?
हे त्यांना माहिती असायला हवे. अशा शब्दात आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिहल्ला चढवला.
शिवसेना पक्षात प्रवेश केलेले आमदार बच्चू कडू यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
बच्चू कडू यांना घरी बोलावून मंत्री केले. हा पण शिवसैनिक सोडून गेला अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आमदार कडू यांच्यावर टीका केली. यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. त्यावेळी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष ,शिवसेना या सर्वांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता संख्याबळासाठी आम्ही देखील त्यांना मातोश्रीवर जाऊन भेटलो. यासाठी एकनाथ शिंदे यांनी आम्हाला फोन केला. शिवसेनेचे संख्याबळ कमी पडत आहे. त्यामुळे अपक्षांचा पाठिंबा आवश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर आम्ही मातोश्रीवर जाऊन पाठिंबा दिला आमच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. हे उद्धव ठाकरे सांगतच नाहीत.
भाजी चिरण्यासाठी मातोश्रीवर गेलो नव्हतो..
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदासाठी अपक्षांची गरज होतीच. त्या बदल्यात आम्हाला मंत्रीपदाची अपेक्षा होती. आम्ही काय भाजी चिरायला मातोश्रीवर गेलो नव्हतो. इतका मोठा माणूस सात वर्षानंतर हा विषय काढतो याचे नवल वाटते. अशी टिप्पणीही बच्चू कडू यांनी यावेळी केली.
देना है तो लेना भी जानते है
आम्हाला काहीच नको आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. असे राजकारणात कोणी म्हणत नाही. असे सांगत आमदार कडू म्हणाले की प्रत्येकाला पद, खाते हवे असते. हे काय बाप लेकाचे नाते आहे का? देना है तो लेना भी जानते है! हा निव्वळ व्यवहार असतो. हे उद्धव साहेबांना समजायला हवे होते.

NEET पेपरफुटी प्रकरणात अटक केलेले ११ पैकी ७ जण महाराष्ट्रातील ; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनीच ती कशी फोडली..?
‘..तर उद्या सकाळी जीवन संपवतो’; मनोज जरांगेंच्या विधानाने राज्यात खळबळ…
‘त्या’ वक्तव्यानंतर NCP नेते नाराज, तरीही शिरसाट बोलतच राहिले, अखेर शिंदेंनी केली कानउघडणी…
आता शत्रू टप्प्यातच. 300 किमी मारा करणाऱ्या मिसाईल, 1000 किमीपर्यंत जाणारे ड्रोन. शिर्डीत दुश्मनांना धडकी भरणाऱ्या शक्तीचा प्रयोग….
चीनच्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, स्फोटामध्ये 90 कामगारांचा मृ्त्यू…
शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप..? 40 आमदार फुटणार..? कधी फुटणार..? बड्या नेत्याने केला मोठा दावा…