शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप..? 40 आमदार फुटणार..? कधी फुटणार..? बड्या नेत्याने केला मोठा दावा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठे राजकीय भूकंप पहायला मिळाले होते. सर्व प्रथम शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना सोबत घेत बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले होते.
कालांतराने राष्ट्रवादीतही फूट पडली होती, अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. मात्र आता एका बड्या नेत्याने शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात – रोहित पवार
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटले की, ‘एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार संपर्कात आहेत. 2029 च्या निवडणुकांच्या आधी सगळं समोर येईल. जवळपास 40 च्या आसपास आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.’
मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत
रोहित पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता आगामी काळात पुन्हा राजकीय भूकंप पहायला तर मिळणार नाही ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत. कारण याआधीही राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलाढाली पहायला मिळाल्या होत्या, त्यामुळे रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळाले आहेत.
खासगी विमानांबाबत ठोस कायदा व्हायला हवा…
रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना इतरही मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित पवार यांनी म्हटले की, ‘दादा जाऊन 4 महिने झाले. दादांच्या अपघाताच्या तपासासाठी अधिवेशनात स्मरण पत्र द्यावं लागलं. अजित पवार आणि आमची एकच इच्छा असल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली होती. दादा गेल्यामुळे चर्चा थांबली. दादांच्या विमानाचा अपघात झाला ते खासगी विमान होतं. उद्या आणखी कोणत्या नेत्याचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खासगी विमानांबाबत ठोस कायदा झाला पाहिजे.

चीनच्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, स्फोटामध्ये 90 कामगारांचा मृ्त्यू…
देवेंद्र फडणवीस यांचा तुकाराम मुंढेंवरील राग जाईना ; महत्त्वाचे पद दिल्याचा देखावा ; प्रत्यक्षात डिमोशन….
“आधी मुख्यमंत्री होतो का मंत्री होतो..?” आमदार बच्चू कडू यांचा सवाल…
कॉक्रोच जनता पार्टीचे अकाऊंट हॅक; बेरोजगारीवरून टीका होत असताना भाजपाकडून रोजगार मेळावा….
विकास लवांडेंना न्यायालयीन कोठडी, जामिनाचा मार्ग मोकळा; कोर्टाने पोलिसांची मागणी फेटाळली….
राज्यसभेच्या जागेसाठी १८ जूनला पोटनिवडणूक ; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक आयोगाची घोषणा…
शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप..? 40 आमदार फुटणार..? कधी फुटणार..? बड्या नेत्याने केला मोठा दावा…