‘त्या’ वक्तव्यानंतर NCP नेते नाराज, तरीही शिरसाट बोलतच राहिले, अखेर शिंदेंनी केली कानउघडणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील बरीच धुसफूस सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजित पवार ) नेते, आमदार संभ्रमात असल्याचं बोललं जात होते. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या २२ आमदारांनी ज्येष्ठ नेते, शरद पवार यांची भेट घेतल्याचं वृत्तही आले होते.
ही बातमी येताच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून आमदारांना फोनो-फोनी करण्यात आली होती. दुसरीकडे महायुतीचे मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं.
संजय शिरसाटांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच, महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संजय शिरसाट यांची कानउघडणी केल्याची माहिती समोर आली आहे.
संजय शिरसाट काय बोलले होते?
“राष्ट्रवादीतून बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादीचे काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेत. पक्षात कोणत्या नेतृत्त्वाखाली काम करायचे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. राष्ट्रवादीत काय घडतंय, हे लवकरच कळेल. पण, राष्ट्रवादी सारे काही अलबेल नाही, एवढं मात्र नक्की आहे,” असं शिरसाट बोलून गेले होते.
आमच्या पक्षाबद्दल शिरसाट कसे काय बोलू शकतात? मुश्रीफ
यानंतर हसन मुश्रीफ यांनी शिरसाट यांची तक्रार एकनाथ शिंदेंकडे करू, असे म्हटलं होते. “संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. तीनही पक्षाची समन्वय समितीची मंगळवारी बैठक असते. आम्ही उदय सामंत आणि दादा भुसेंकडे शिरसाटांबद्दल स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. आमच्या पक्षात काहीही झालं तरी शिरसाट कसे काय बोलू शकतात? असे सामंत आणि भुसेंना सांगितलं होतं. तरीही शिरसाटांनी पुन्हा पक्षाबद्दल वक्तव्य केले आहे. येणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंकडे शिरसाटांची तक्रार करणार आहोत,” असे मुश्रीफ म्हणाले होते.
काय तक्रार करायची तर करुद्या – शिरसाट
मुश्रीफांच्या विधानानंतर आज ( शुक्रवार, २२ मे ) संजय शिरसाट म्हणाले, “मी काय वाईट बोललो, हेच मला कळलं नाही. राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात आहेत. मग एकमेकांच्या संपर्कात नसावे का? संपर्कात म्हणजे पक्ष फुटतोय, असा अर्थ का घेता? पक्षात अलबेल नाही, असं तुम्हाला म्हणायचे आहे का? उबाठा-काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते, आमच्या संपर्कात आहेत. लोकशाहीत आपण एकमेकांच्या संपर्कात राहणे, हे केव्हाही चांगलं मानलं जाते. एखाद्याला तुम्हाला सोडून जायचे तर जाणारच आहे. मुश्रीफांना काय तक्रार करायची तर करूद्या, मी माझी भूमिका मांडली आहे.”
अशी वक्तव्ये करू नका – एकनाथ शिंदे
आता एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना फोन करून समज दिली आहे. “महायुती संदर्भात करण्यात येत असलेली वक्तव्य थांबवा. महायुतीत फूट पडेल, असे काही बोलू नका, आपल्याला तीनही मित्रपक्षांना घेऊन सरकार चालवायचे आहे. त्यामुळे पुन्हा अशी वक्तव्ये करू नका,” अशी कानउघडणी एकनाथ शिंदेंनी शिरसाटांची केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘..तर उद्या सकाळी जीवन संपवतो’; मनोज जरांगेंच्या विधानाने राज्यात खळबळ…
आता शत्रू टप्प्यातच. 300 किमी मारा करणाऱ्या मिसाईल, 1000 किमीपर्यंत जाणारे ड्रोन. शिर्डीत दुश्मनांना धडकी भरणाऱ्या शक्तीचा प्रयोग….
चीनच्या कोळसा खाणीत मोठी दुर्घटना, स्फोटामध्ये 90 कामगारांचा मृ्त्यू…
शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप..? 40 आमदार फुटणार..? कधी फुटणार..? बड्या नेत्याने केला मोठा दावा…
देवेंद्र फडणवीस यांचा तुकाराम मुंढेंवरील राग जाईना ; महत्त्वाचे पद दिल्याचा देखावा ; प्रत्यक्षात डिमोशन….
“आधी मुख्यमंत्री होतो का मंत्री होतो..?” आमदार बच्चू कडू यांचा सवाल…
‘त्या’ वक्तव्यानंतर NCP नेते नाराज, तरीही शिरसाट बोलतच राहिले, अखेर शिंदेंनी केली कानउघडणी…