केंद्र,राज्य सरकारचा निषेध,स्थगिती उठवा ; तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन : युवकांचा आक्रोश , छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी. अन्यथा अध्यादेश काढा ;
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर महागाव येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजातून रोष व्यक्त होत आहे.
मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षण कायम ठेवण्यात यावे,सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करून पाच न्यायमुर्तीच्या घटनापीठाचा अंतिम निर्णय येई पर्यत स्थगिती उठविण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत,राज्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करून मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय सेवांमध्ये लागू असलेले एसइबीसी आरक्षण अखंडित ठेवण्यासाठी त्वरित आदेश काढण्यात यावा,मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय होत नाही तो पर्यंत मराठा समाजाच्या वाट्याला येणाऱ्या शासकीय नौकर भरती मधील सर्व जागा रिक्त ठेवण्यात याव्यात यासह विविध विषयांवर निवेदन देण्यात आले.यावेळी तेजस पाटील नरवाडे,सरोज देशमुख,अनुप ठाकरे,गणेश भोयर,प्रवीण विलास नरवाडे,सुनील नरवाडे,शैलेश कोपरकर,प्रवीण ठाकरे,सुरेश नरवाडेसंदीप ठाकरे,संजय नरवाडे,डॉ संदीप शिंदे,पंकज देशमुख,अवि नरवाडे,उदय नरवाडे,सतीश ठाकरे,श्रीकांत देशमुख,सोनू पाटील,आशिष गावंडे,प्रा. दीपक गावंडे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.