महायुती सरकारचं महामंडळ वाटप फायनल ; ‘या’ फॉर्म्युल्याने होणार जागांचे वाटप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यातील महायुती सरकारकडून बहुप्रतिक्षित महामंडळ वाटपाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतरपासूनच महायुतीमधील अनेक इच्छुक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते महामंडळांवरील नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत होते.
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत महामंडळांचे वाटप लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या महिनाभरात राज्यातील विविध महामंडळांवरील नियुक्त्यांचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युलाही जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार भाजपला सुमारे ४८ टक्के, शिवसेने ला २९ टक्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ला सुमारे २० टक्के महामंडळांचा वाटा मिळू शकतो. मात्र कोणत्या पक्षाच्या वाट्याला नेमकी कोणती महामंडळे जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
राजकीय लॉबिंगलाही सुरुवात
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महामंडळ वाटपाच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही पक्षांकडून विविध महामंडळांवर कोणत्या नेत्याची नियुक्ती करायची, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्या महायुतीतील अनेक इच्छुक नेते आणि पदाधिकारी सक्रिय झाले असून, राजकीय लॉबिंगलाही सुरुवात झाल्याचे दिसत आहे.
महत्त्वाची भूमिका
महामंडळांच्या नियुक्त्या या केवळ राजकीय सन्मानापुरत्या मर्यादित नसून अनेक निर्णय प्रक्रियांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे या पदांसाठी महायुतीतील नेत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि इतर राजकीय समीकरणे लक्षात घेता हे वाटप अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
एकूण 17 जागांवर राजकीय चुरस रंगणार
दरम्यान, राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांसाठी निवडणूक होणार असून 18 जून रोजी मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. एका जागेसाठी पोटनिवडणूकही होणार असल्याने एकूण 17 जागांवर राजकीय चुरस रंगणार आहे.
कोणाला किती जागा
या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा जाणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, यावर महायुतीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली तर राजकीय हालचाली लवकर शांत होण्याची शक्यता आहे. मात्र मतदान झाल्यास 22 जूनपर्यंत महायुती आणि विरोधकांमध्ये राजकीय डावपेच रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकारणात चर्चेचा मोठा विषय
राजकीय विश्लेषकांच्या मते, विधानपरिषद निवडणुकीनंतरच महामंडळ वाटपाच्या प्रक्रियेला अधिक गती मिळू शकते. त्यामुळे पुढील काही दिवसांत महायुतीतील अंतर्गत समीकरणे, इच्छुकांची लॉबिंग आणि जागावाटपाचे गणित राज्याच्या राजकारणात चर्चेचा मोठा विषय ठरणार आहे.

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?