“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “मध्य पूर्व आशियामधील तणाव अजूनही सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. अमेरिका आणि इराणमधील संभाव्य युद्ध रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान समोर आले आहे.
बुधवारी (२० मे) पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील चर्चा आता एका अत्यंत ‘नाजुक वळणावर’ पोहोचली आहे. त्यामुळे इराणकडून योग्य आणि सकारात्मक उत्तर मिळेपर्यंत ते आणखी काही दिवस वाट पाहण्यास तयार आहेत.
आपल्या विशेष विमान ‘एअर फोर्स वन’मधून उतरल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी थेट चेतावणी दिली की, जर यावेळी मुत्सद्देगिरी अपयशी ठरली, तर आखातातील परिस्थिती अतिशय वेगाने बिघडू शकते.
“आम्हाला इराणकडून १०० टक्के अचूक उत्तर हवेय” : ट्रम्प
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेची आक्रमक भूमिका मांडताना सांगितले की, “आता या प्रकरणात एकतर दोन्ही देशांमध्ये काहीतरी ठोस करार होईल किंवा मग अमेरिका अत्यंत कठोर पाऊल उचलेल.” ट्रम्प पुढे म्हणाले, “मला या युद्धात निष्पाप लोकांचे बळी जाताना पाहायचे नाहीये, म्हणूनच मी कोणत्याही घाईगडबडीत नाही आणि इराणच्या उत्तराची काही दिवस वाट पाहत आहे. परंतु, जर आम्हाला योग्य उत्तर मिळाले नाही, तर आमची लष्करी कारवाई अत्यंत तीव्र आणि वेगवान असेल. आमची लष्करी तयारी पूर्ण झाली असून आम्हाला इराणकडून १००% अचूक उत्तर हवे आहे.”
यापूर्वी सोमवार रोजी ट्रम्प यांनी एक मोठा खुलासा केला होता की, ते इराणवर हवाई हल्ल्याचे आदेश देण्यापासून अवघे ‘एक तास दूर’ होते, परंतु त्यांनी हा निर्णय ऐनवेळी टळला. ट्रम्प यांच्या सांगण्यानुसार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सर्वोच्च नेत्यांनी केलेल्या विशेष विनंतीनंतर त्यांनी हा हल्ला रोखला. आखाती देशांच्या नेत्यांनी ट्रम्प यांना आश्वासन दिले आहे की, इराणसोबत गंभीर चर्चा सुरू असून, इराण कधीही अणुशस्त्र बनवणार नाही याची हमी देणारा करार नक्की स्वाक्षरी केला जाईल.
इराणचा पलटवार: “दबाव आणून शरण आणणे हा केवळ भ्रम!”
दुसरीकडे, अमेरिकेच्या या अटींवर आणि धमक्यांवर इराणनेही अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केले की, “आमच्या बाजूने चर्चेचे सर्व रस्ते खुले आहेत, परंतु केवळ दबाव आणून इराणला सरेंडर करणे हा अमेरिकेचा केवळ एक भ्रम आहे.”
पेजेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, इराणने नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आश्वासनांचे पालन केले आहे आणि युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, “डिप्लोमसीमध्ये परस्परांचा आदर करणे हा युद्धाच्या तुलनेत अधिक समजूतदारपणाचा, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारा मार्ग आहे.”
इराणने पुन्हा ठेवल्या जुन्या मागण्या!
शांतता करारासाठी इराणने आपल्या जुन्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे. यामध्ये अमेरिकेने परदेशात जप्त केलेली इराणची अब्जावधी डॉलर्सची संपत्ती त्वरित मुक्त करावी आणि इराणच्या बंदरांभोवती अमेरिकेने लावलेली समुद्री नाकेबंदी पूर्णपणे संपवावी, या मुख्य अटींचा समावेश आहे. दरम्यान, इराणचे मुख्य वार्ताकार मोहम्मद बगेर गालिबफ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे की, अमेरिका केवळ चर्चेचे नाटक करत असून या बहाण्याने नवीन युद्धाची पार्श्वभूमी तयार करत आहे. अमेरिकेच्या या भूमिकेमुळे जागतिक बाजारात चिंतेचे वातावरण आहे.

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?
जमीन मोजणी, गावठाण नोंदी, नगर भूमापनासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 50 नवी कार्यालयं, 10 हजार पदांवरही मोहर….
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!