Skip to content
Thu. May 21st, 2026
  • Home
  • आध्यात्मिक
  • कृषिसंपदा
  • क्राइम जगत
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • साहित्य जगत
  • पर्यावरण
  • शैक्षणिक
  • E-paper
Politics Special Live

Politics Special Live

विदर्भातील क्रमांक १ चे राजकीय विश्लेषक वृत्तपत्र

Primary Menu
  • Home
  • आंतरराष्ट्रीय
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • विदर्भ
    • बुलढाणा
    • नागपूर
  • यवतमाळ
    • महागाव
    • उमरखेड
    • पुसद
  • विशेष बातम्या
    • आध्यात्मिक
    • कृषिसंपदा
    • क्राइम जगत
    • पर्यावरण
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सांस्कृतिक
    • साहित्य जगत
  • E-paper
  • Home
  • मेळघाटातील जंगलांना भीषण आग; वनसंपदा खाक, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात…!
  • Breaking News

मेळघाटातील जंगलांना भीषण आग; वनसंपदा खाक, वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात…!

politics special 2 hours ago

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चिखलदरा :-
“मेळघाटच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यांतील वन विभाग तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात बुधवारी सकाळपासून भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेळघाटात हा वनवा पेटला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक होत आहे.

या भीषण आगीमुळे मौल्यवान वनस्पती, वन्यजीव आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत असून अनेक भागांत आग अजूनही धगधगत आहे.

​या गंभीर परिस्थितीबाबत ‘खोज’ संस्थेचे ॲड. बंड्या साने यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी यांना तातडीने संपर्क करून माहिती दिली. जंगलाला लागलेल्या या मोठ्या आगीची गांभीर्याने दखल घेत, क्षेत्र संचालकांनी मेळघाटच्या धारणी, चिखलदरा आणि परतवाडा येथील सर्व उपवनसंरक्षकांसह वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत.

​रोरा, सेमाडोहसह अनेक भागांत वनवा!

​धारणी व चिखलदरा तालुक्यातील रोरा, भवई, सेमाडोह, एकताई, हतरू, मांगिया या सर्वच ठिकाणी जंगलात आग लागल्याची माहिती ॲड. बंड्या साने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विशेषतः भवई ते सेमाडोह दरम्यानच्या दुर्गम भागात जंगलाने रौद्र रूप धारण केले आहे. या आगीच्या विळख्यात मेळघाटातील मोठा जंगल परिसर सापडल्याने वन्यजीवांचे प्राणही धोक्यात आले आहेत.

​अतिरिक्त यंत्रणा पुरवण्याची गरज

​सध्या मेळघाटातील आगीची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि गंभीर बनली आहे. वन विभागाने प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तातडीने अतिरिक्त मनुष्यबळ, आधुनिक अग्निशमन साहित्य आणि आवश्यक ती सर्व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणून पुढील मोठी हानी टाळता येईल, अशी मागणी केली जात आहे.

Share News

Post navigation

Previous लोकसंख्येनुसारच आरक्षण हवे..! ; केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत….
Next महायुती सरकारचं महामंडळ वाटप फायनल ; ‘या’ फॉर्म्युल्याने होणार जागांचे वाटप….

Related Stories

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
  • Breaking News

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….

politics special 35 minutes ago
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
  • Breaking News

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….

politics special 44 minutes ago
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
  • Breaking News

उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…

politics special 46 minutes ago
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
  • Breaking News

“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!

politics special 49 minutes ago
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
  • Breaking News

शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….

politics special 52 minutes ago
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?
  • Breaking News

राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?

politics special 56 minutes ago

आपला जिल्हा