अजबच..! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “उत्तर पूर्व जिल्ह्यातील करावल पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका उपनिरीक्षकाने डिमोशनची मागणी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीष यांनी स्वेच्छेने पदावनतीची विनंती केली होती आणि आता डीसीपींनी त्यांची विनंती मान्य करून त्यांना पुन्हा कॉन्स्टेबल बनवण्यात आले आहे.
मनीष यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एक निवेदन देत म्हटलं की, मला उपनिरीक्षक पदावर काम करण्यास रस नाही. मला पुन्हा कॉन्स्टेबल बनवावे अशी मागणी केली. या अनोख्या मागणीने सगळेच त्याची चर्चा करू लागले. मनीष यांच्या मागणीनंतर त्यांची चौकशी करण्यात आली. या मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी मनीष यांची पडताळणी करण्यात आली. ज्यात त्यांच्याविरोधात कुठलीही विभागीय, गुन्हेगारी अथवा देखरेख समितीचा खटला प्रलंबित आहे का हे पाहिले गेले. त्यानंतर उपायुक्त यांनी मनीष यांचा अर्ज स्वीकारत त्यांना कॉन्स्टेबल बनवले.
माहितीनुसार, मनीष यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक कॉन्स्टेबल म्हणूनच केली होती. त्यानंतर विभागीय परीक्षा देत ते उपनिरीक्षकपदापर्यंत पोहचले. परंतु प्रमोशननंतर वाढत्या जबाबदाऱ्या आणि व्यस्तता यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. मनीष यांना शिक्षणात खूप रस होता. ते स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. उपनिरीक्षक पदामुळे मिळणारा कमी वेळ अभ्यासासाठी पुरेसा नाही. त्यामुळे पुन्हा कॉन्स्टेबल बनून ते अभ्यासासाठी जास्त वेळ देऊ इच्छितात असं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी सांगितले.
मनीष २०१८ साली पोलीस खात्यात भरती झाले होते. तेव्हापासून ते विविध परीक्षांची तयारी करत आहे. २०२३ साली दिल्ली पोलिसांच्या विभागीय परीक्षेत त्यांनी यश मिळवले त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण केल्यावर मनीष करावल येथे उपनिरीक्षक म्हणून काम पाहू लागले. नव्या नियमानुसार उपनिरीक्षकांना त्यांच्या सेवा काळात ६-७ जिल्ह्यात काम करणे बंधनकारक असते. त्यात मनीष यांनी अभ्यासासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे डिमोशन करण्याची विनंती केली. त्यानंतर ही विनंती मान्य करत मनीष यांना पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आले.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….