ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पश्चिम बंगालमधील ज्या ३१ मतदारसंघांमध्ये विजयाचे अंतर हे मतदारसंघात मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीनंतर (एसआयआर) वगळण्यात आलेल्या मतांच्या संख्येपेक्षा कमी आहे, त्याबाबत ममता बॅनर्जी आणि इतर उमेदवार नव्याने याचिका दाखल करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.
सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी न्यायालयात दावा केला की, आमचा उमेदवार केवळ ८६२ मतांनी पराभूत झाला, मात्र त्याच मतदारसंघात एसआयआरमध्ये ५,५५० मते वगळण्यात आली होती. अशा प्रकारे राज्यातील ३१ जागांच्या निकालावर परिणाम झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक आयोगाने याला विरोध केला असून, अशा तक्रारींसाठी निवडणूक याचिका हाच एकमेव कायदेशीर मार्ग असल्याचे म्हटले आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की या विशिष्ट मुद्द्यावर उमेदवार स्वतंत्र अर्ज करू शकतात. मतदारयाद्यांमधून नावे वगळलेल्यांनी लवादाकडे दाद मागितली आहे. मात्र, त्यासाठी चार वर्षांचा कालावधी घेतला जाईल, अशी भावना असल्याचे ज्येष्ठ वकील मनेका गुरुस्वामी यांनी नमूद केले.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….