महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्राने पहिले पाऊल उचलले आहे.
परदेश दौरे टाळण्याच्या त्यांच्या सूचनेला प्रतिसाद देत, यंदाच्या कान महोत्सवात शिष्टमंडळ पाठविणार नसल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी जाहीर केले.
इराणच्या युद्धानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, मोदी यांनी इंधनाच्या वापरात बचत करण्याचे, सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ‘वर्क फ्रॉम होम’च्या पर्यायाचाही विचार करण्याची सूचना त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर, ॲड. शेलार यांनी त्यांच्या विभागाचे तीन निर्णय जाहीर केले आहेत.
फ्रान्सच्या कान येथे १२ मे रोजी कान महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्रातून ‘जीव-द क्रिचर’ हा कोकणी आणि ‘एप्रिल मे ९९’ या दोन चित्रपटांची निवड झाली आहे. दरवर्षी या महोत्सवासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी जात असतात. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही अधिकारी सहभागी होणार नाही.
शेलार म्हणाले, ”या महोत्सवात सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपट तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय आणि सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील, तसेच ऑनलाइन सहभागी होईन मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल, तिथे आभासी स्वरूपात सहभागी होऊ.”
तसेच, आपल्या विभागाच्या कामकाजामध्ये कमीत कमी वाहनांचा वापर होईल आणि ही वाहने विजेवरील असतील, यासाठी प्राधान्य असेल. तसेच, मंगळवारपासून (ता. १२) होणाऱ्या जास्तीत जास्त बैठका आभासी स्वरूपातील असतील, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….