विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “विदर्भात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून भीषण उष्णतेच्या लाटेने संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने अकोला जिल्ह्यात एका ३० वर्षीय तरुण शेतमजुराचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शिरसोली येथील श्याम इंगळे हे शेतात काम करत असताना त्यांना उष्णतेचा तीव्र फटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विदर्भात उष्माघाताच्या रुग्णांचा आकडा आता ३५० च्या पार पोहोचला असून, एकट्या अकोला जिल्ह्यात ३२३ रुग्णांची नोंद झाली आहे.
प्रशासन ‘अलर्ट मोड’वर
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर आले असून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने उपचार कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यातली स्थिती काय?
दुसरीकडे अकोल्यासोबतच अमरावती जिल्ह्यातही १० रुग्ण आढळले असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने कडक नियमावली (SOP) जाहीर केली आहे. अकोला शहरात नागरिकांना भर उन्हात थांबावे लागू नये म्हणून दुपारी १२ ते ५ या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांमध्ये १३० हून अधिक खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून डॉक्टरांची पथके २४ तास तैनात आहेत.
प्रशासनाचे आवाहन
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानाचा पारा ४८ अंशांपर्यंत जाण्याचा इशारा दिला असल्याने, नागरिकांनी दुपारी १२ ते ५ या वेळेत घराबाहेर पडू नये, सुती कपड्यांचा वापर करावा आणि तहान नसली तरी भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लाट अधिक तीव्र होणार
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे शेतमजुरांच्या कामाच्या वेळाही बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विदर्भातील ही उष्णतेची लाट येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….