मुलगा मुख्यमंत्री झाला..! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्याला विजय यांचे चाहते, टीव्हीकेचे हजारो समर्थक यांच्यासह विजय यांचे आई-वडीलही उपस्थित होते.
दरम्यान, शपथविधीवेळी विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सुरुवात केल्यावर विजय यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर आणि आई शोभा चंद्रशेखर यांचं मन भरून आलं. या भावूक क्षणी त्यांना आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत. हा प्रसंग कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
विजय यांच्या जीवनात त्यांच्या आई-वडिलांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. दरम्यान, आज विजय यांच्या शपथविधीवेळी त्यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर आणि आई शोभा चंद्रशेखर हे समोरील प्रेक्षागारात बसले होते. तसेच शपथविधीवेळी त्यांना आपल्या यशस्वी मुलाच्या जीवनातील ऐतिहासिक क्षण पाहताना आपल्या भावना लपवता आल्या नाहीत. यादरम्यान, विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू ओघळले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, आज झालेल्या शपथविधी सोहळ्यावेळी विजय यांच्यासोबत इतर ९ जणांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यावेळी थिरू एन. आनंद, आधव अर्जुन, अरुण राज, के. ए. सेंगोटैय्यन, पी. वेंकेटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि एन. कीर्तना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….