‘भारत माता की जय’ बोलू पण, ‘वंदे मातरम्’ नाही, मुस्लिम नेत्याचं वादग्रस्त विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आम्हाला ‘भारत माता की जय’ म्हणण्यात कोणताही कमीपणा वाटत नसून, आमचा विरोध फक्त ‘वंदे मातरम्’ म्हणण्याला आहे, असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस फरहान आजमी यांनी केले आहे.
बुधवारी सायंकाळी पालिका मुख्यालयात समाजवादी पक्षाच्या गटनेता कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
भिवंडी पालिका मुख्यालयातील पक्षाच्या गटनेता कार्यालयाचे उद्घाटन फरहान आजमी यांनी फीत कापून केले. या वेळी रियाज आजमी, गटनेते आरीब याकूब शेख, नगरसेवक, पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, उद्घाटन झालेल्या कार्यालयातून नागरिकांना न्याय देण्याचे काम होईल, असे आजमी यांनी सांगितले.
नागरी समस्यांवर बोला
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेखकुठे आहेत, हे आम्हीच आता शोधत आहोत. त्यांच्या छातीवर ते आता समाजवादी पक्षाचा बिल्ला नाही लावत. ज्या पक्षाने त्यांना ओळख दिली, आमदार म्हणून निवडून दिले. त्यांना मत देताना नागरिकांनी रईस शेख यांना नाही तर सायकल या चिन्हावर मतदान केलं आहे. आम्ही आता सायकलवर फिरवून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू, असा उपरोधिक टोला लगावत फरहान आजमी यांनी रईस शेख यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्याचे उत्तर देताना त्यांनी दिलेले कारणे न पटणारी आहेत.
भिवंडीत भ्रष्टाचार वाढला असताना विरोधातील समाजवादी पक्षाचा आमदार सरकारचे गुणगान करीत आहे, हे हास्यास्पद असल्याची टीका करीत येथील जनतेच्या नागरी समस्यांवर न बोलता आमदार रईस शेख भाजपचे आमदार झाल्याचे वाटत आहे, अशी टीका फरहान आजमी यांनी आमदार रईस शेख यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील..? ; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले….
“आता बंगालमध्ये…”; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले…?
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….