पुसद येथील गौतम बुद्ध विहार समिती तर्फे बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील गौतम बुद्ध विहार समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड पुसद यांच्या वतीने बौद्ध पौर्णिमा उत्सव शहरातील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळा क्रमांक 2 येथे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजू दुधे (माजी पाणीपुरवठा सभापती विद्यमान नगर सेवक) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर सेवक भारत जाधव , माजी बांधकाम सभापती भवरसिंह सिसोदिया , उमाकांत पापीनवार (जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट) , विठ्ठलराव खडसे शिक्षण सभापती नप पुसद , संतोष आंभोरे (अध्यक्ष भीमशक्ती) , प्रियंका कांबळे नगरसेविका नप पुसद , शितल कुमार वानखेडे सर (प्रवक्ता शिव फुले शाहू आंबेडकर) , लक्ष्मण कांबळे अध्यक्ष (RPI) आठवले गट) , पांडुरंग व्यवहारे (अध्यक्ष बिरसा मुंडा बिग्रेड) , नटवर उंटवाल (समाजसेवक) , रहेमान चव्हाण (प्रतिनिधी पॉलिटिक्स स्पेशल) अर्जुन भगत (माजी प्रज्ञापर्व अध्यक्ष) , भगवान धुळे यांची विशेष उपस्थिती होती.
सर्व प्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर गौतम बुद्ध विहार समिती महिला मंडळ यांच्या वतीने सामूहिक बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले व उपस्थित सर्व पाहुण्यांच्या वतीने सर्व उपस्थितांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्यानंतर भोजनदान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजभिये सरांनी केले तर आभार प्रदर्शन माधव हाटे यांनी केले या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम यादव हाटे (अध्यक्ष गौतम बुद्ध विहार समिती पुसद) व समस्त महिला मंडळांनी घेतले व उपस्थितांन सह असंख्य नागरिकांनी भोजनदानाचा आस्वाद घेतला हे विशेष…

राज्यातील नगरपरिषद-नगरपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर….
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी….
आता TMC मध्येच मोठा खेला..! उभी फूट पडणार..? ममता बॅनर्जी यांच्यासमोर ते मोठे आव्हान….
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेसाठी रस्सीखेच; चार माजी खासदारांसह भुजबळांचे नाव चर्चेत, कोणाची लागणार वर्णी..?
नाईक कुटुंबियांचा 20 ते 25 कोटी रुपयांच्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण…
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर मी., सुप्रिया सुळेंचं सर्वात मोठं वक्तव्य….