नातवाने केला आजीचा निघृण खून
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलढाना
दिनेश मुडे मो:९७६३१२५०७२
आजीवर नातवाने विळ्याचे वार करून निघृण खून केल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील खुरमपूर या
ठिकाणी घडल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. सदर खुनाची माहिती मिळताच ठाणेदार रविंद्र देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन खुनी नातवाला अटक केली.
याबाबत स सविस्तर असे की खुरमपूर येथील ६५ वर्षीय
लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे ह्या आपला नातू नामदेव भवरलाल नागरे सह खुरमपूर याठिकाणी राहत होत्या गुन्हेगारी प्रवृत्ती असलेला नामदेव (आजीला) लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे यांना दारूसाठी पैशाची, दागिन्यांची मागणी करत असे दारूसाठी पैशे देण्यास नकार दिल्याने नामदेव याने आज दिनांक ३सप्टेंबर रोजी सकाळी ३ वाजता दरम्यान गाढ झोपेत असलेल्या आपल्या आजीवर रागाच्या भरात घरात पडलेल्या विळ्याने सपासप वार केले दरम्यान ६५ वर्षीय लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे यांचा मृत्यू झाला. नातवानेच आपल्या आजीचा खून केल्याची माहिती सकाळी ६ वाजता उघडकीस आल्यावर गावकऱ्यांनी लोणार पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रविंद्र देशमुख हे सहायक पोलीस निरिक्षक अजहर शेख, हेड कॉन्स्टेबल बन्सी पवार, सुरेश बोरे, सचिन सौभागे, गोपनीय शाखेचे कैलास चतरकर, चंद्रशेखर मुरडकर, गजानन ठाकरे यांच्या सह घटनास्थळी पोहोचले आणि खुनाच्या संशयावरून नातवाला ताब्यात घेतले आहे. तसेच मृतक लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आला की खुनी नामदेव नागरे वर पुढील कारवाई केली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. नामदेव पवार यानेच ६५ वर्षीय लक्ष्मीबाई लिंबाजी नागरे यांच्यावर विळ्याचे वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी (नातू) नामदेव नागरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह लोणारच्या ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक श्री. अजहर शेख करत आहेत.
लक्ष्मीबाई नागरे यांचे पती लिंबाजी नागरे हे भारतीय सैन्यात होते सेवा निवृत्ती नंतर लक्ष्मीबाई नागरे यांना लिंबाजी नागरे यांची पेंशन चे २७ -३० हजार रुपये दरमहा मिळायचे पेंशन पैशावर नामदेवची नजर होती वारंवार मांगुणही पैसे मिळत नसल्याचा राग डोक्यात ठेऊन नामदेव ने आज आपल्या पालन goकर्त्या आजीवर विळ्याने सपासप वार केले आणि आजीला कायमचे संपवून टाकले.अशी माहिती काही सूत्रांनी दिली आहे.