जिल्ह्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु; 124 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर;22 जणांना सुटी
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 3 :
गत 24 तासात जिल्ह्यात तब्बल सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 99 झाली आहे. तर जिल्ह्यात 124 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 22 जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64 वर्षीय महिला, 82 वर्षीय पुरुष व 67 वर्षीय पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील 49 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 64 वर्षीय पुरुष, नेर शहरातील 52 वर्षीय पुरुष आणी वणी शहरातील 40 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 124 जणांमध्ये 76 पुरुष व 48 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील 45 पुरुष व 31 महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष, आर्णी शहरातील एक पुरूष व तीन महिला, आर्णि तालुक्यातील दोन पुरुष, दारव्हा शहरातील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष, पांढरकवडा शहरातील पाच, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील सहा पुरुष व पाच महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, यवतमाळ शहरातील पाच पुरूष व पाच महिला, यवतमाळ तालुक्यातील एक महिला व जिल्ह्यातील एक पुरूष पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 695 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 243 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3727 झाली आहे. यापैकी 2689 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 99 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 196 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरूवारी 186 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 52185 नमुने पाठविले असून यापैकी 48864 प्राप्त तर 3321 अप्राप्त आहेत. तसेच 45137 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.