फुलवाडी येथे आमरण उपोषण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
फुलवाडी :- “दि. 23 जानेवारी 2025 पासून फुलवाडी गावातील ग्रामस्थ पनशिरा शेत पांदण रस्त्याच्या मागणीसाठी फुलवाडीच्या ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले.
दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी ग्रामस्थांनी तहसीलदार पुसद,पोलीस स्टेशन खंडाळा यासह अनेक विभागांना निवेदन दिले. देवठाणा शिवारामध्ये फुलवाडी गावातील शेतकऱ्यांची शेती आहे. त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी रस्त्याची कुठलीही सोय नसल्याने या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.शेतामध्ये शेतकरी, शेतमजूर, जनावरांना जाणे येणे करणे,शेतातील माल घरी आणणे, शेतात बी बियाणे,खते नेणे पावसाळ्यात रस्त्या अभावी अतिशय कठीण होते.सोयाबीन सारखे पीक गंजी लावून ठेवावी लागते. जंगली जनावरं त्याची नासाडी करतात.त्यामुळे देवठाणा येथील पनशिरा शेत पांदणरस्ता करून देण्याची मागणी अनेक वेळा शासनाकडे ग्रामस्थांनी निवेदना द्वारे केली.परंतु आजपर्यंत शासनाने या ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल घेतली नाही.त्यामुळे गावातील नागरिक पांदण रस्ता करून देण्याच्या मागणी साठी आमरण उपोषणास बसले आहेत. तरी तहसीलदार साहेब पुसद व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन हा गंभीर प्रश्न निकाली काढावा. अशी फुलवाडीसह आजूबाजूच्या खेड्यातील शेतकऱ्यांची मागणी होत आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..