ग्रा. प. कार्यालय फुलवाडीच्या इमारतीचे मोहिनीताई नाईक यांच्या हस्ते लोकार्पण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “स्व.बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी 2024-25 योजने अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले.या नवीन इमारतीचे लोकार्पण ऍड.मोहिनीताई इंद्रनिल नाईक अध्यक्ष न प पुसद यांच्या शुभहस्ते दिनांक 21जानेवारी 2025 रोजी करण्यात आले. कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून ऍड मोहिनीताई नाईक,तर प्रमुख पाहुणे फुलवाडी गावच्या सरपंच सौ विमलबाई तुकाराम राठोड, राजेंद्र चव्हाण,नांदगावकर साहेब, विनायक राठोड,भिका राठोड,उपसरपंच ईशान राजेंद्र चव्हाण,मधुकर पवार पोलिस पाटील,यादवराव चव्हाण, भाटू पवार,देविदास जाधव,मांगीलाल चव्हाण , डॉ प्रमोद चव्हाण,शामराव चव्हाण, मोतीराम माघाडे,पुण्यरथाबाई बेले,बळीराम चव्हाण,अर्चनाबाई कांबळे व गावातील प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

तालुक्यात 24 ग्रामपंचायत कार्यालयापैकी फुलवाडी गावची ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम सर्वप्रथम सुंदर व सुबक झाले.राजेंद्र चव्हाण यांनी पाझर तलाव, पांदण रस्ता व बंधारा या समस्या आपल्या प्रास्ताविकातून मांडल्या. मोहिनी ताई नाईक यांनी फुलवाडीची ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत आहे, 100% घरकुल बांधणी मध्ये गावाला जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले. शासनाच्या अनेक योजना उत्कृष्ट पणे राबविण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे संचालन शिक्षक गजानन पाचकोरे यांनी तर आभार गावचे उपसरपंच ईशान चव्हाण यांनी केले.याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव बी एस गुळवे व ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..