मुनगंटीवार अन् जोरगेवार यांच्यातील वाद शमता शमेना; नागपुरातील बैठकीत पुन्हा शाब्दिक चकमक; चंद्रपूरचा वाद आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोर्टात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “चंद्रपूर महानगरपालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी रविवारी नागपुरात पुन्हा भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र काल च्या या बैठकीत देखील सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
या आधी गुरुवारी याच विषयावर नागपुरात झालेली बैठक वादळी ठरली होती. तर काल झालेल्या बैठकीत जोरगेवार आणि मुनगंटीवार या दोन्ही गटांकडून भाजप उमेदवारांच्या स्वतंत्र्य याद्या पक्षाकडे सोपविण्यात आल्या आहेत. मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद पाहता आता पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूरच्या भाजप उमेदवारांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकल्याची माहिती सूत्रांनी देत आता आजदेवेंद्र फडणवीस यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. फडणवीस यांच्या निर्णयानंतर उद्याच भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, नागपूर येथील विदर्भ कार्यालयात झालेल्या या बैठकीत माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेती, निवडणूक प्रभारी माजी खासदार अशोक नेते, निवडणूक प्रमुख आणि आमदार किशोर जोरगेवार, भाजप शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार आणि माजी शहराध्यक्ष राहुल पावडे उपस्थित होते.
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी संपूर्ण 151 जागेवर उमेदवारांची नावे निश्चित
दरम्यान, नागपूर महानगर पालिका निवडणुकीत युती किवा आघाडीचे अजून चित्र स्पस्ट नसल्याचीमाहितीआहे. मात्र भाजप व शिवसेना यांच्यात युतीची चर्चा सकारात्मक टप्प्यात आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत संपूर्ण 151 जागेवर उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. यात शिवसेनेच्या वाट्यात जाणाऱ्या जागेवर शिवसेनेने दिलेल्या नावांसह चर्चा झाली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला अजून चर्चेला पण बोलवले नसल्याने राष्ट्रवादी युतीत असण्याची शक्यात नाममात्र दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी करायची, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मात्र मित्र पक्ष सन्मानजनक जागेसाठी अडून बसले आहे.
यात काँग्रेसने पालिकेची 100 प्लसचा नारा देऊन टाकला आहे. उमेदवारी अर्ज भरायला दोन दिवस शिल्लक असल्याने आज रात्री उशिरा चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सुधीर मुनगंटीवारांकडून पक्षश्रेष्ठी पुढे चार निकष
दरम्यान, यापूर्वीझालेल्या बैठकीत उमेदवार निश्चित करताना चार निकष वापरण्यात यावे, अशी अट सुधीर मुनगंटीवार यांनी घातल्याची माहिती आहे. त्यात एका कुटुंबात एकापेक्षा जास्त उमेदवारी दिली जाणार नाही. कुठल्याही नेत्याच्या निष्क्रिय मुलांना उमेदवारी दिली जाऊ नये. एक दोन महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ नये. उमेदवारी फक्त सर्वेक्षणच्या रिपोर्टच्या आधारे त्यामधील इलॅक्टोरयल मेरिटच्या आधारे दिली जाईल. अशा सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षापुढे ठेवल्याची माहिती आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून श्री नटवरलाल गणेश उंटवाल यांची अविरोध निवड….
महाराष्ट्रात एमआयएम पक्षात राजकीय भूकंप, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा…..
समृद्धी महामार्गावर मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात, तिघे गंभीर जखमी; वाहनाचा चुराडा….
शरद पवारांना सर्वात मोठा झटका; मुंबईत बड्या नेत्याचा भाजप प्रवेश निश्चित..? निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड….
पुण्यात भाजपचे 100 उमेदवार निश्चित, 80 जणांना एबी फॉर्म वाटले, पहिला उमेदवारी अर्ज कोण भरणार..?
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी ; एकनाथ शिंदेंनी दिले आदेश….