जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु;43 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 29 : गत 24 तासात जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 79 झाली आहे. तर जिल्ह्यात 43 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या चार जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
मृत झालेल्यांमध्ये आर्णि तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 55 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा शहरातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 43 जणांमध्ये 27 पुरुष व 16 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 10 पुरुष व 13 महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, आर्णि तालुक्यातील एक पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील चार पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व एक महिला आणि पांढरकवडा शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 713 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 150 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3165 झाली आहे. यापैकी 2223 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 79 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 156 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी 60 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 47392 नमुने पाठविले असून यापैकी 45606 प्राप्त तर 1786 अप्राप्त आहेत. तसेच 42441 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….