कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा; राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 मोठे निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (30 सप्टेंबर) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्करोगच्या रुग्णांसाठी मोठा निर्णय निर्णय घेण्यात आला आहे. आता कर्करोगग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्यातील रुग्णांना उपलब्ध करुन देण्याच्या धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. राज्यात कर्करोगाच वाढत प्रमाण लक्षात घेता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 5 महत्वाचे निर्णय:
1. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग-
कर्करोग रोग उपचारासाठी सर्वसमावेशक असे धोरण निश्चित. नागरिकांना कर्करोग रोगासंदर्भात दर्जेदार उपचार मिळणार. त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित. राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार. यात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) ही कंपनी स्थापन होणार. कंपनीच्या भागभांडवलासाठी शंभर कोटींचा निधी.
2. उद्योग विभाग-
महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र (ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर – GCC) धोरण २०२५ मंजुर. विकसित भारत २०४७ च्या वाटचालीस सुसंगत अशी वाटचाल व्हावी यासाठी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय सहकार्य या गोष्टीना प्रोत्साहन मिळणार.
3. ऊर्जा विभाग-
औद्योगिक, वाणिज्यिक व इतर वर्गवारीतील ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारण्यास मंजुरी. यामुळे प्रधानमंत्री कुसुम घटक-ब व अन्य योजनेंतर्गत सौर कृषीपंपासाठी वीज पुरवठा करण्याकरिता निधी उपलब्ध होणार.
4. नियोजन विभाग-
महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास मंजुरी. भू-स्थानिक तंत्रज्ञान (Geospatial Technology) चा वापर करून प्रशासनात गतिमानता आणणार. या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रात धोरणात्मक नियोजन करण्यास आणि निर्णय घेण्यास मदत होणार.
5. विधि व न्याय विभाग-
सातारा जिल्ह्यात फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय होणार. या न्यायालयासाठी आवश्यक पदांना व त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मंजूरी…

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….