आगामी निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडीही फुटणार, संकेत मिळाले…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत महायुती आणि महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता.
काँग्रेस, अजित पवार गटासह अनेक पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे संकेत.
काही ठिकाणी युती, पण बहुतांश ठिकाणी कालचे मित्र आज विरोधक म्हणून आमनेसामने.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये फूट पडू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये पक्ष एकसंध राहणार नसल्याचे काही नेत्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. ज्या ठिकाणी गरज भासेल तेव्हाच महायुती, महाविकास आघाडी एकत्र दिसतील. पण बहुतांश ठिकाणी कालचे मित्र आज विरोधक म्हणून आमनेसामने उभे राहतील असे चित्र दिसणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपला पक्ष निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी पक्षजनांना सूचना देखील केल्या आहेत. काँग्रेस पक्ष देखील स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहेत. फक्त महाविकास आघाडीच नाहीतर महायुतीतील पक्ष देखील एकमेकांसमोर उभे ठाकतील असे म्हटले जात आहे.
काँग्रेस स्वबळावर लढल्यास आश्चर्य वाटणार नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती असल्याने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार अशी चर्चा आहे. आपण स्वबळावर लढले पाहिजे, तसे केल्यास मोठे यश मिळेलच असे नाही पण त्या निमित्ताने पक्ष प्रत्येक ठिकाणी पोहोचेल अशी काँग्रेसची भूमिका आहे.
मुंबई महापालिकेत महायुती एकत्र असेल, पण ठाण्यात एकत्र दिसण्याची शक्यता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले. पुणे, पिंपरी चिंचवड येथे स्वतंत्र लढण्यावर अजित पवार गट जोर देत आहे. छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्येही महायुती एकत्र लढण्याची शक्यता कमी आहे. विदर्भ, मराठवाड्यात भाजपला स्वबळाचे वेध लागले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….