भारताविरुद्ध युद्ध करण्याचे धाडस करु नका, अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “भारताने पाकिस्तानवर मध्यरात्री 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन पहलगाम हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर आता जगभरातून प्रतिक्रिया येत आहे.अमेरिकेकडूनही पाकिस्तानला इशारा मिळाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचा दावा व्हाईट हाऊसच्या अधिकृत सूत्रांनी केला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले आहे की, पाकिस्तानने भारताच्या एअर स्ट्राईक विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा विचार करू नये. पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध करण्याचे धाडस करू नये. रुबियो म्हणाले की, भारताला दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा अधिकार आहे. आता भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने कोणताही हल्ला करु नये किंवा तशी योजना आखू नये.
भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर मार्को रुबियो यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, मी भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आजच्या आधी केलेल्या टिप्पण्यांवरून आशा व्यक्त होते की हे लवकरच संपेल आणि शांततापूर्ण तोडग्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्व एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील.
भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांची हत्या केली. या हल्ल्यात अनेक महिलांनी त्यांचे पती गमावले आणि २६ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यानंतर, भारताने ७ मे रोजी रात्री उशिरा पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांवर हल्ला करून त्यांना उद्ध्वस्त केले. या हवाई हल्ल्यानंतर आता जगभरातून प्रतिक्रिया येत आहेत.
हल्ल्यांनंतर लगेचच, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोलून त्यांना कारवाईदरम्यान केलेल्या कारवाईची माहिती दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही परिस्थितीवर भाष्य केले आणि तणाव जलद कमी होण्याची आशा व्यक्त केली. ते म्हणाला, भारत आणि पाकिस्तान बऱ्याच काळापासून लढत आहेत, मला आशा आहे की ते लवकरच संपेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..