भारतीय लष्कराची पत्रकार परिषद, ‘ऑपरेशन सिंदूर’ची महत्त्वाची माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला हल्ला केला आहे. भारताने या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने संयुक्तपणे केली. आता भारतीय लष्कर बुधवारी या कारवाईची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे.
सकाळी १० वाजता पत्रकार परिषद
‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती देण्यासाठी बुधवारी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. यात ऑपरेशनशी संबंधित महत्त्वाची माहिती शेअर केली जाईल. ही पत्रकार परिषद मीडिया सेंटर, पीआयबी, नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल.
९ ठिकाणांना लक्ष्य
संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली की मंगळवारी रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान आणि पीओकेमधील एकूण नऊ (9) ठिकाणांना लक्ष्य केले. ही सर्व ठिकाणे आहेत जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखण्यात आले आणि निर्देशित केले गेले. संरक्षण मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की आमच्या कृती केंद्रित आणि आक्रमक नसलेल्या आहेत. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे.
पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या आमच्या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल सविस्तर माहिती आज सकाळी दहा वाजता दिली जाईल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..