घुसके मारा! पाकिस्तान विरूद्धच्या ऑपरेशनला ‘सिंदूर’ नाव देण्यामागे आहे भावनिक कारण…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पहलगाम हल्ल्यानंतर भारत काय कारवाई करणार याची उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला खुली सुट दिली होती. लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील मुजफ्फराबादमध्ये घुसून नऊ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केले.
मध्यरात्री एक वाजून 30 मिनिटांनी एअर स्ट्राईक करण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर’मधून घेण्यात आला. या ऑपरेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सिंदूर’ नाव देण्यामागचे भावनिक कारण देखील समोर आले आहे.
दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात महिलांच्या समोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या. महिलांना टार्गेट करण्यात आले. महिलांचे सौभाग्य त्यांच्या डोळ्यासमोरच उजाडण्यात आले. सौभाग्याच्या प्रतीक सिंदूर म्हणूनच या ऑपरेशनला सिंदूर हे नाव देण्यामागचा विचार असावा.
पाकिस्तान लष्कराची कबुली, आठ जणांचा मृत्यू
भारताने केलेल्या एअर स्टाईकनंतर पाकिस्तान लष्कराकडून सांगण्यात आले की सहा ठिकाणी 24 हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामध्ये आठ जणांचा मृत्यू आणि 33 लोक जखमी झाले आहेत.
‘या’ नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक
1. बहावलपूर
2. मुरीदके
3. गुलपूर
4. भीमबर
5. चक अमरू
6. बाग
7. कोटली
8. सियालकोट
9. मुजफ्फराबाद

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..