तलाव ठेका मागणी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 16 :- पाटबंधारे, जलसंधारण विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे मासेमारी हक्काचे हस्तांतरण झालेले 0 ते 500 हेक्टर पर्यंतचे तलाव तलाव ठेका समितीमार्फत पात्र संस्थांना मासेमारीकरीता देण्यात येणार आहे. त्यासाठी दि.9 मे पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 15 तलाव सन २०२५-२६ ते २०२९-३० या ५ वर्ष कालावधीकरीता ठेक्याणे देण्यात येणार आहे. या तलावांमध्ये शिवणी, तालुका घाटंजी, लोहतवाडी, तालुका नेर, पिरंजी, तालुका उमरखेड, कुंभारकिन्ही-एक, तालुका दारव्हा, झोला, तालुका बाभुळगाव, घटाना, तालुका यवतमाळ, शेनद, तालुका महागाव, पोफाळी, तालुका उमरखेड, सिंगणडोह, तालुका नेर, उमर्डा, तालुका यवतमाळ, कोळंबी, तालुका यवतमाळ, दुरुग तालुका कळंब, निंगणूर, तालुका उमरखेड, नेर प्रकल्प, तालुका नेर, नवरगाव, तालुका मारेगाव या 15 तलावांचा समावेश आहे.
सदर तलाव शासन निर्णयानुसार मासेमारीकरीता ठेक्याने द्यावयाचे आहेत. या तलावांपैकी संबंधित तलावांकरीता नोंदणीनुसार, उपविधीतील कार्यक्षेत्रानुसार पात्र असणाऱ्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी तलाव ठेका मागणी प्रस्ताव दि.9 मे पर्यंत सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तां.) कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला माळा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, यवतमाळ येथे सादर करावा व अधिक माहितीकरीता कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..