बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 16 :- भारत सरकारच्यावतीने 5 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना त्यांच्या शौर्यकरिता प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहबे.
सदर अर्ज https://www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात सादर करता येतील. ऑनलाईन अर्ज दि. १ एप्रिल ते दि. ३१ जुलैपर्यंत स्विकारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक पात्र 5 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांनी केलेल्या असाधारण कामाचे व शौर्यकरिता ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर सादर करावे. पुरस्काराच्या अटी व शर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्राप्त ऑनलाईन अर्जाच्या आधारे केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चाळणी करून पात्र बालकांची निवड करण्यात येणार आहे. निवडलेल्या बालकास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र बालकांनी शौर्य पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विशाल जाधव यांनी केली आहे.