खासदार नवनीत राणा यांना कोरोना ची लागण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागण झाली आहे. चार दिवस आधी नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आमदार रवी राणा आई-वडिलांना घेऊन नागपूरला आले होते. नवनीत राणा मुलांची काळजी घेण्यासाठी घरीच थांबल्या होत्या. गुरुवारी अस्वस्थ वाटू लागल्याने चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले. रॅपिड टेस्टमध्ये नवनीत राणा यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यांनतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची सुद्धा टेस्ट करण्यात आली. सर्वांनी दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.नवनीत राणा यांनी याआधी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आरोग्य कर्मचारी मुलाचा स्वॅब घेतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. यावेळी त्यांनी, “हे प्रभू सर्वांना या कोरोनाच्या महामारीतून लवकर मुक्त कर, मी एक खासदार जरी असली तरी सोबतच आई सुध्दा आहे. आज माझा लहान मुलगा रणवीर याचे स्वाब घेताना ज्या पद्धतीने तो रडायला लागला हे पाहून आई म्हणून मलासुद्धा खूप वेदना झाल्या,” अशा भावना व्यक्त केल्या होत्या.खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांच्याही कुटुंबातील सात जणांना करोनाची बाधा झाली आहे. नवनीत राणा यांच्या सासूबाई, सासरे, नणंद, पुतणे, भाची या सगळ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तसंच आमदार रवी राणा यांच्या अंगरक्षकालाही करोना झाला आहे. राणा कुटुंबातल्या ज्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना उपचारांसाठी नागपूर येथे पाठवण्यात आलं आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….