एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय , सांस्कृतिक भवन वसतिगृहाला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणार : आमदार इंद्रनील नाईक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुका हा आदिवासी बहुल भाग म्हणून गणल्या जातो. जिल्ह्यातील नेर,दारव्हा, दिग्रस,आर्णी,उमरखेड, महागाव व पुसद तालुका असे मिळून पुसदला एकात्मिक आदिवासी विभागाचे कार्यालय आहे.मागील अनेक वर्षांपासून हे कार्यालय भाड्याच्या जागेत आहेत.आदिवासी समाजातील समाजबांधवांनी या बाबींचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. त्यांनी पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांना निवेदन सादर केले होते.आमदारांनी याची तात्काळ दखल घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात बैठक बोलावली.यात एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय, सांस्कृतिक भवन, मुलींचे वसतिगृह व मुलांचे वसतिगृह एकाच परिसरात शहरातील मध्यवर्ती जागेत उपलब्ध करुन देण्याची मागणी आदिवासी समाज बांधवांनी केली. आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना केली.
या बैठकीला आमदार इंद्रनील नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, सहाय्यक निबंधकउमरखेड तथा यवतमाळ जिल्हा सहकारी सूतगिरणीचे अवसायक जी.एन. नाईक स, प्रकल्प अधिकारी धाबे , गटविकास अधिकारी शिवाजी गवई ,गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, आदिवासी सेवक मारोतराव वंजारे,जिल्हा परिषद सदस्य गजानन उघडे, पंचायत समिती सदस्य गजानन फोपसे, सुरेश धनवे, रामकृष्ण चौधरी, पांडुरंग व्यवहारे,श्यामराव व्यवहारे, राजेश ढगे, रामदास भडंगे,संदेश पांडे व इतर समाजबांधव उपस्थित होते.