निसर्गाच्या वाढत्या बदलामुळे सागवानाच्या वृक्षाला आले केस पैनगंगा अभयारण्यात अनोखे वृक्ष
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
पैनगंगा अभयारण्यातील सीमेवर असलेल्या उमरखेड तालुक्यातील डोंगरगाव (बोरगाव) गावाच्या परिसरात सात ते आठ सागवान वृक्षांना मानवाच्या डोक्यावर असणाऱ्या केसासारखे हुबेहूब केस सागवान जातीच्या खोडातून उगवले आहेत
डोंगरगाव(बो) गावातील एक डोरका आपली जनावरे चारण्यासाठी स्मशानभूमीच्या जवळ पैनगंगा नदी पात्राच्या कडेवर अचंबित करणारे वृक्ष त्या डोरक्याला दिसले त्याने गावातील काही ग्रामस्थांना याबाबत माहिती सांगितल्यानंतर गावातील काही नागरिक त्या वृक्षांला बघण्यासाठी ग्रामस्थ गेले त्या वृक्षाला बघितल्यानंतर सागवान जातीच्या झाडाला मानवी शरीरावर जसे केस असतात त्याप्रमाणे हुबेहूब त्या झाडाला केस आढळले त्यामुळे काही ग्रामस्थ अचंबित झाले
या सागवान ना विषयी संबंधित परिसरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतीच कल्पना नाही निसर्गाच्या वाढत्या बदलामुळे काहीतरी वृक्षा मधून कोम फुटल्याप्रमाणे केस दिसत असल्याने काही कृषीतज्ञ शेतकरी आश्चर्यचकित झाले आहेत या वृक्षाची माहिती परिसरात पसरता अंधश्रद्धेचा वावर पसरल्या सारख्या त्या वृक्षाचे काही नागरिकांनी केस काढून नेत आहेत डोंगरगाव परिसरातील गावातील नागरिक त्या वृक्षा जवळ जाऊन पूजा सुद्धा करत आहे काही नागरिकांच्या मते धन शोधणारे व करणी करणारे पुजारी परिसरात फिरत आहे या वृक्षास संदर्भात कोरटा वनपरिक्षेत्र अधिकारी खैरनार यांनी वृक्षाचा विषय हसण्यावर नेला आहे व पुढील त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही
या वृक्षाविषयी वरिष्ठांना विचारणा केली असता पैनगंगा अभयारण्य वन्य जीव पांढरकवडा विभागीय अधिकारी सुभाष पुरानिक साहेब यांच्या मते त्या वृक्षाला आलेले कोम म्हणजेच ते फंगस …अळंबीचा प्रकार आहे असे मत त्यांनी पत्रकारांना पुढे नोंदवले आहे
काही रुक्ष प्रेमींनी या वृक्षाबद्दल माहिती सांगताना निसर्गाची होत असलेले बदल त्यातून काहीतरी हा प्रकार आहे असे त्यांचे मत आहेत संबंधित विभागाने त्या वृक्षाची माहिती घेऊन त्या वृक्षाबद्दल खुलासा करून डोंगरगाव परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करावी जेणेकरून परिसरामध्ये अंधश्रद्धेचा पसार होणार नाही अशी मागणी परिसरातील वृक्षप्रेमी करत आहेत