एक है, तो सेफ है! राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *विधानसभा निवडणुकीत भाजपकडून एक है तो सेफ हे असा नारा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात घेतलेल्या सभांमध्ये सातत्याने एक है तो सेफ यावर जोर दिला आणि काँग्रेसवर जातींमध्ये भांडण लावण्यात येत असल्याचा आरोप केला.
या आरोपांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं. यावेळी धारावीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी निशाणा साधला. एक है तो सेफ है यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावत भर पत्रकार परिषदेत एक तिजोरी दाखवण्यात आली. या तिजोरीतून पंतप्रधान मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांचे फोटो काढले. तसंच धारावीचा नकाशा असलेलं पोस्टर हातात घेत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी एक है तो सेफ है असं म्हणतात ते योग्यच आहे. पण कोण एक आणि कोण सेफ असा प्रश्न आहे. एक है तो सेफ है, एक नरेंद्र मोदी, अदानी, अमित शहा,आणि कोण सेफ तर अदानी सेफ. त्रास फक्त धारावीच्या जनतेला, नुकसान धारावीच्या जनतेला, लघु उद्योगाचं प्रतिक धारावी आहे. हे संपेल. त्यांनी नारा दिला आम्ही तुम्हाला समजावून सांगितला.
इथली जमीन धारावीत राहत असलेल्यांचीच आहे. ते तिथं काम करतात. लघु उद्योगांचं हब आहे. तिथलं हे सगळं काम फक्त एका व्यक्तीला मदत करण्यासाठी आहे. सगळी राजकीय ताकद ही एका व्यक्तीला मदत करण्यासाठी लागलीय. ही धारावीच्या जमिनीची चोरी आहे. याच व्यक्तीला देशाचे विमानतळ, मॅन्युफॅक्चरिंग दिलं जातंय. जुनं नातं आहे पंतप्रधानांचं, हे अदानी एकटे करू शकत नाही. पंतप्रधानांशिवाय हे होऊच शकत नाही. महाराष्ट्राचं धन हे राज्यातल्याच जनतेला मिळावं की एका व्यक्तीला मिळावं का असा सवालसुद्धा राहुल गांधी यांनी विचारला.
जे प्रोजेक्ट महाराष्ट्राचे आहेत ते इतर राज्यात गेले. वेदांत फॉक्सकॉन हिसकावला टाटा एयरबस , आयफोन असेंबल प्रोजेक्ट , ड्रग्स पार्क, सेमीकंडक्टर प्लांट असे अनेक प्रकल्प ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नेली. ८ प्रकल्प तुम्ही परराज्यात पाठवले ५ लाख युवकांचा रोजगार गेला असा घणाघाती आरोपही राहुल गांधी यांनी केला. तसंच धारावीतील स्टेकहोल्टरच्या सहकार्याने सहमतीने आम्ही विकास घडवू असं आश्वासनही राहुल गांधी यांनी यावेळी दिलं.