लॉकडावून ब्रेकिंग : कोरोना संबंधाने पालकमंत्री संजय राठोड यांची आढावा सभा ; यवतमाळ नेर दारव्हा मध्ये सोमवार पासून संचारबंदी शिथिल ?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ
जिल्ह्यात रोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यात प्रामुख्याने पुसद,दिग्रस आणि पांढरकवडा या शहरांचा समावेश आहे. तसेच यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे सुद्धा कमीजास्त प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असली तरी गत 10 दिवसात तुलनेने येथील रुग्ण संख्येत घट झाल्याचे निदर्शनास येते. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज सकाळी व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे लॉकडाउन संदर्भात जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला. यात त्यांनी, यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे रुग्णांची संख्या कमी होत असल्याने या शहरातील लॉकडावून मध्ये शिथिलता देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. मात्र पांढरकवड़ा, पुसद आणि दिग्रस येथे पॉजिटिव्ह रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता या शहरातील लॉकडावून पुढील सात दिवस कायम ठेवावे, असेही आदेशीत केले.
त्यानुसार यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथे सोमवारपासून लॉकडावून हटवून सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत दुकाने उघडण्यास मुभा देण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी बाजारपेठ उघडी असतांना व सायंकाळी 5 नंतर कुठेही अनावश्यक गर्दी करू नये, बाहेर जातांना मास्कचा वापर करावा, आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे काटेकोरपने पालन करावे. विशेष म्हणजे लॉकडावून मध्ये सूट देण्यात आलेल्या यवतमाळ, दारव्हा आणि नेर येथील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले नाही, विनाकारण गर्दी केली आणि पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली तर मग प्रशासनासमोर वरील शहरात पुन्हा लॉकडावून शिवाय पर्याय राहणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.