कोरोनाचा विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम व उपाय मानसोपचार तज्ञ मिलिंद आपटे यांचे वेबिनार द्वारे मार्गदर्शन ;पुसद अर्बन बँकेचा उपक्रम
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद-
कोरोना संकटाचा समाजातील विविध वर्गाच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने पुसद अर्बन कॉ ऑप बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतुन व बँकेच्या सामाजिक उपक्रमातुन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ तथा मार्गदर्शक मिलिंद आपटे यांचे उद्या रविवार २ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३ वाजता कोरोनाचा व्यापारी, कर्मचारी,शेतकरी व सामान्य नागरिकांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम व उपाय या विषयावर व्हेबिनारचे आयोजन केले आहे.
या व्हेबिनार ला राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष तथा महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल चे सदस्य अॅड. आशिष देशमुख, अ.भा. काँ.कमिटी चे सचिव अॅड.सचिन नाईक, जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा सचिव सचिन चौधरी,राज्य उपाध्यक्ष मराठा सेवा संघ अरविंद गावंडे,यवतमाळ जि.प. च्या माजी अध्यक्षा डॉ आरती फुफाटे, विश्वनाथसिंह बयास पतसंस्थेचे अध्यक्ष निशांत बयास,
चेम्बर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरज डुब्बेवार, उपाध्यक्ष संतोष अग्रवाल,माजी अध्यक्ष बिपीन चिद्दरवार, प्रगतशील शेतकरी अभय गडम ,नारायण क्षीरसागर, साप्ताहिक पॉलिटिक्स स्पेशल चे मुख्य संपादक रितेश पुरोहित तसेच काळी दौ.येथील माजी सरपंच गौतम रणवीर व तेथील शेतकरी तसेच वालतुर रेल्वे येथील शेतकरी पॅनलिस्ट म्हणून जुळणार आहेत. सदर व्हेबिनर झूम अँप सह शरद मैंद यांच्या फेसबुक पेजवर दिसणार आहे.या महत्वपूर्ण व्हेबिनार चा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद व संचालक मंडळ यांनी केले आहे.
पुसद अर्बन बँकेचे सामाजिक उपक्रमातून अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून दिनांक २६ जुलै रोजी covid-१९ अद्यावत माहिती व जबाबदाऱ्या व उपाययोजना या विषयावर नागपूर शासकीय महाविद्यालयातील सुपरिटेंडेंट तथा नागपूर कोरोना टास्क फोर्स चे सदस्य डॉ. अविनाश गावंडे यांनी मार्गदर्शन केले हे मार्गदर्शन शरद मैंद फेसबुक लाईव्ह पेजवर तसेच झूम ॲपवर हजारो लोकांनी पाहिले.