शिगेला पोहोचलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार..! आता प्रतिक्षा मतदानाची….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- *राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी आपली कंबर कसत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
या उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली, सभा, कॉर्नर सभा आदी होत आहेत. उमेदवरांचा हा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, आज या प्रचार तोफा थंडवणार आहे. आज प्रचाराचा शेवटाचा दिवस असून सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. नियमानुसार, सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता जरी होणार असली तरी छुपा प्रचार मात्र सुरु राहणार आहे. शेवट्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या दरम्यान उमेदवारांकडून केला जाईल.
महाराष्ट्र विधानसाभा निवडणुकीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी घोषणा केली होती. निवडणूक जाहीर होताच राजकीय वातावरण ढवळून निघत राजकीय हलचालींना वेग आला. निवडणूक कार्यक्रमानुसार, 22 ते 29 ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती तर 4 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीची शेवटची मुदत होती. माघारीच्या तारखेनंतर, राज्यातील निवडणूक प्रचाराचा जोर वाढला. या दरम्यान, प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रचार करण्यावर भर दिला. प्रचारासाठी स्थानिक नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचार सभा, रॅली, मिटिंग आदी पार पडल्या. दरम्यान, प्रचार हा शिगेला पोहोचत शेवटच्या मतदारापर्यंत आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्ह पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले गेले. प्रचार सभेदरम्यान, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडण्यात आल्या. असा हा शिगेला पोहोचलेल्या प्रचाराच्या तोफा आज म्हणजेच सोमवार 18 नोव्हेंबर रोजी थंड होणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता प्रचाराची सांगता होणार आहे.
आज होणार दिग्गज नेत्यांच्या सभा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रचार करण्याचा प्रत्येक पक्षाचा आणि उमेदवाराचा प्रयत्न असणार आहे. या दरम्यान आज विविध पक्षांतर्फे दिवसभर दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा देखील घेतल्या जातील. दिग्गज नेत्यांच्या या सभा महत्त्वाच्या ठरणार आहे. कारण या सभा निवडणुकीचं वातावरण बदलवणाऱ्या ठरु शकतात.
छुपा प्रचारावर भर
निवडणूक आयोगाच्या सुचनांनुसार, आज म्हणजेच सोमवार 18 रोजी सायंकळी 6 वाजेनंतर प्रचार थांबणार आहे. यानंतर कोणत्याही प्रकारची सभा, मतदारांवर प्रभाव पाडले असे कृत्य, जाहिराती प्रसिद्ध करण्यास बंदी राहील. याकाळात निवडणूक अचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे गरजे आहे. प्रचार बंदी असतान कुणी प्रचार करतांना आढळल्यास त्या पक्षावर किंवा उमेदवारावर गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. असे असले तरी अनेक उमेदवार हे छुप्या पद्धतीने शेवट्या क्षणापर्यंत आपला प्रचार करतील यात शंका नाही. आज सायंकाळनंतर हा छुपा प्रचार सुरु होत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदावर करतील. यावर लक्ष ठेवण्याचे आव्हान निवडणूक आयोगासमोर राहणार आहे.