“उमेद” मधील गैरप्रकाराच्या चौकशी साठी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठीत जि.प. सभापती राम देवसरकरांची माहीती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
प्रशांत भागवत
उमरखेड,
तालुक्यातील महिला बचत गटाचे काम प्रशंसनिय आहे. या बचतगटांना वेठीस धरून . ‘उमेद’ च्या माध्यमातून झालेल्या गैरप्रकाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करणार असून त्या करिता तीन सदस्यीय समिती गठीत झाली आहे. बचत गटाच्या महिलांना न्याय देण्यासोबतच दोषींची गय केल्या जाणार नाही, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी दिली.
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद कक्ष संपुर्ण महाराष्ट्रात चालविला जातो. महिला सक्षमीकरण आणि सशक्तिकरण करण्यासाठी बचत गट महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे अर्थवेद बायो या कंपनीकडून कोणत्याही दबावाखाली ग्राम संघातील महिलांनी कीटकनाशक औषधी खरेदी केले ? हे पाहणे गरजेचे आहे. ग्राम संघाने काय खरेदी करायचे आणि काय खरेदी करायचे नाही. हा वैयक्तिक विषय ग्राम संघाचा आहे. या प्रकरणामुळे बचत गटातील महिलांचे मनोबल कमी करण्याचा प्रकार घडला असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. त्यामुळे बचत गटातील महिलांचे खच्चीकरण होत आहे परंतु सदर खच्चीकरण होऊ देणार नाही. गटातील महिलांनी कुठलीही भीती बाळगण्याची अथवा कुणाच्याही दबावाखाली येऊन काम करू नये तसेच अधिकारी कर्मचारी यांनी देखील दबावात येऊ नये. दोषी नसेल तर नक्कीच त्याला न्याय मिळेल मात्र कर्तव्यात कसूर झाला असेल तर योग्य त्या कार्यवाहिस संबंधिताने तयार राहावे असा ईशारा देवसरकर यांनी दिला..
तालुक्यातील मार्लेगाव, चिंचोली, मुळावा, पोफाळी, कळमुला, उंचवडद, बारा, निंगनूर, आदी ठिकाणच्या बचत गटा कडुन जादा भावाने किटकनाशके विकत घेतल्याचा सदर प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.
महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरणासाठी बचत गट महत्त्वाचा दुवा ठरतो. बचत गटामुळे आज महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यात सक्षम ठरत आहेत. परंतु काही महिलांकडून बचत गटात फसवणूक झालेली आहे अशी तक्रार निवेदनाद्वारे आली आहे. परंतु,काही ग्राम संघातील महिलांची फसवणूक झाली नाही, असे देखील निवेदन अनेक गावातील बचत गटातील महिलांनी दिल्याने या प्रकरणाची चौकशी होणे गरजेचे आहे.
शिवाय बचत गटातील एकत्रीकरणामुळे महिलांमध्ये उत्साह आहे. उद्योगधंदा उभारून महिला पैसा गोळा करून उदरनिर्वाह करतात. बचत गटातील फिरते भांडवल यामुळे उद्योगधंदे उभे करण्यास वाव आहे. आरोप-प्रत्यारोप यामुळे महिलांचे खच्चीकरण होत आहे. बचत गटातील महिलांना प्रेरणा देऊन महिलांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे.
या प्रकरणाच्या सखोल चौकशी करिता तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष हे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर आहेत तर सदस्य सचिव म्हणून उमेद चे जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष चे नीरज नखाते तर पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी गवळी हे समितीत सदस्य असतील अशी माहिती मिळाली आहे.या प्रकरणात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला म्हणून अनेकांच्या भुवया उंचावणार्या या प्रकरणात मुळात भ्रष्टाचार झाला की नाही ? हे शोधण्यासह दोषींवर कारवाइ करून बचत गटाच्या महिलांनमध्ये नवी उमेद जागवण्याचे आव्हान राहणार आहे.
बचत गटाच्या महिलांना न्याय देणारच -राम देवसरकर
अध्यक्ष चौकशी समिती
औषधी खरेदी प्रकरणात घडलेल्या प्रकाराचे सत्य लवकरच समोर येईल. मात्र बचत गटातील माहिलांनी आपला धीर सोडू नये शिवाय अधिक जोमाने कामाला लागावें या प्रकरणात कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर अन्याय होणार नाही शासन प्रशासन सदैव महिलांच्या पाठीशी आहे.