जिल्ह्यात कोरोनाचे 47 रुग्ण : पुसद मध्ये कोरोना रुग्णाचा उद्रेक ; एकट्या पुसदमध्ये आज 43 जणांना कोरोनाची लागण ; लॉकडाऊन यासंबंधी प्रशासनाची तातडीने बैठक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संसर्गात वाढ असून आज तब्बल ४७ रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये पुसद शहरात कोरोनाचे ४३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. पांढरकवडा पाठोपाठ आता पुसद कोरोना हॉटस्पॉट बनत आहे.तर यवतमाळ शहरात आणखी ४ रुग्णांची भर पडली आहे.
पुसद शहरातील नवीन पुसद, महाविर नगर, वसंतनगर, श्रीरामपूर या भागात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. शहरातील ॲक्टिव पॉझिटिव्ह रुग्ण संख्या १९५ झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा विळखा पुसद तालुक्या सह जिल्ह्यात वाढत असून ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे .या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होत आहे. ही बैठक सुरू असून जिल्ह्यामध्ये सात दिवस लॉक डाऊन वाढवायचा की नाही किंवा त्याचे काय परिणाम होतील या मुद्द्यावर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले असून लॉकडाउन बाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आढलेलेल्या रुग्णांमध्ये पोलीस दलातील अधिकारी सुद्धा कोरोना पॉझिटिव आढळल्याचे समोर येत आहे. एकंदरीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….