आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांत दोन्ही बंधू सात ते आठ वेळा एकत्र आले आहेत.
20 वर्षे एकमेकांचं तोंड न पाहणारे दोन्ही भावांच्या मनोमिलनामुळे महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघालंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीची फक्त औपचारिकताच शिल्लक राहिलीय. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत युती करणार म्हणजे राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार याची चर्चा आता सुरु झालीये. राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेसमधील काही नेत्यांनी विरोध केला आहे. यामुळे आडची भेट जास्त चर्तेत आली आहेय दिवाळी नंतर टाकेर बंधू मोठा निर्णय जाहीर करु शकतात.
राज आणि उद्धव ठाकरेंची पुन्हा भेट झालीय. उद्धव ठाकरे मातोश्रीवरून थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेलेत. चार दिवसांपूर्वी राज ठाकरेसह कुटुंब शिवतीर्तावर गेले होते. मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंनी उदघाटन केलं होतं. त्यानंतर चार दिवसानंतर पुन्हा उदधव ठाकरे मातोश्रीवर गेलेत. दोन्ही बंधूंमध्ये राजकीय चर्चा सुरु असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे लवकरच युतीची घोषणा दोन्ही बंधू करणार का याकडे लक्ष लागलंय. गेल्या तीन महिन्यात राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल 9 वेळा भेट झाली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीतल्या संभाव्य समावेशाला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी विरोध केलाय. एवढंच नाहीतर काँग्रेस नेते भाई जगतापांचाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी आघाडीला विरोध असल्याचं सांगितलंय. काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना गायकवाड आणि जगतापांची भूमिका मान्य नाही. मनसेनं यावरुन काँग्रेसवर टीका केलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं गायकवाड-जगतापांच्या मताला फारसं महत्व देत नसल्याचं सांगितलंय.
मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास दोन दशकानंतर पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी सुरूच आहेत. त्यामुळे पुढील काळातही भेटीगाठींचं सत्र अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे, तसंच निवडणुकीच्या मैदानात देखील ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे.
1 महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची चर्चा कशामुळे सुरू झाली?
गेल्या ३ ते ४ महिन्यांत दोन्ही बंधू सात ते आठ वेळा (काही माहितीनुसार नऊ वेळा) एकत्र आले आहेत. २० वर्षे एकमेकांचे तोंड न पाहणाऱ्या या बंधूंच्या मनोमिलनामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. युतीची फक्त औपचारिकता शिल्लक राहिली असल्याची चर्चा आहे.
2 राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर युती करणार का?
होय, राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींमध्ये राजकीय चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय, आणि दिवाळीनंतर मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.
3 अलीकडील ठाकरे बंधूंच्या भेटी कशा घडल्या?
चार दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि कुटुंब मातोश्रीवर गेले होते, जिथे मनसेच्या दीपोत्सवाचे उद्धव ठाकरेंनी उद्घाटन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर गेले. मराठीच्या मुद्द्यावरून जवळपास दोन दशकानंतर पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर ते एकत्र आले होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….