“कोण काय बोलतय यावर मत व्यक्त करणार नाही” : संजय राऊत असे का म्हणाले..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मविआमध्ये मनसे नको, असा सूर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आळविण्यास सुरुवात केली आहे.
या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराज व्यक्त करत मित्र पक्ष काँग्रेसला फटकारले.
एकीकडे मत चोरीचा आरोप करत महाविकास आघाडीतसह मनसेने १ नोव्हेंब रोजी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केली आहे. अशाच मविआमध्ये मनसे नको, असा सूर काँग्रेसच्या काही नेत्यांनी आळविण्यास सुरुवात केली आहे. या भूमिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराज व्यक्त करत मित्र पक्ष काँग्रेसलाच फटकारले.
कोण काय बोलतय यावर मी आता मत व्यक्त करणार नाही
संजय राऊत आज (23 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, काँग्रेस आमचा महाविकास आघाडीतील मित्र पक्ष आहे. आता काँग्रेसने तो निर्णय घेतला असेल तर त्यांचा प्रश्न आहे. संयुक्त लढ्यासारखा वातावरण सध्या महाराष्ट्रात आहे. आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसने समजून घेतल पाहिजे.कोण काय बोलतात तेव्हा मी मत व्यक्त करणार नाही, असेही त्यांनी काँग्रेसला सुनावले.
आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं
महापौर पदाचा काय घेऊन बसला आहात. काँग्रेसची साथ सोडणार नाही असा प्रश्नच कुठे निर्माण झाला नाही. आम्हाला देशाचा पंतप्रधान काँग्रेस पक्षाच्या नेत्याला करायचे होते. आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं, असेस्पष्ट करत आम्हाला काही अडचण असेल तर आम्ही राहुल गांधींशी व्यतिरिक्त काही चार प्रमुख नेते त्यांच्याशी बोलू, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबईतल्या प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत
मुंबईतल्या प्रत्येक समाजातील माणूस हा आमच्या सोबत आहेत, असा दावा करत हा शेवटी मुंबईचा प्रश्न आहे. आमच्या ज्या चौकशा करायचे त्या करा, तुम्ही मुख्यमंत्री आहात, असे आव्हान देत २०२९9 पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री पदी राहतील का हा माझा प्रश्न आहे, असेही राऊत म्हणाले.
फडणविसाना शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष फोडायचाय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष फोडायचा आहे, या आरोपाचा पुन्नरुच्चार करत दोन दोन गुडघ्यावर बाशिंग बांधून देणाऱ्या शिंदे यांच्या स्वप्नावर पाणी फेरले, फडणवीसांना स्वयंभू राजकारण करायचा आहे. फडणवीसांना शिंदे यांचा बंदोबस्त करायला तयार आहे, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठीक ठिकाणी उफाळून आलाय
अलीकडच्या काळामध्ये भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष ठीकठिकाणी उफाळून आला आहे. भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट असा संघर्ष सूरु आहे. धनगेकरांना मालमसाला पुरवणारे हात वेगळे आहेत. धनगेकर एक मोहरा आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….