स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठवाडा विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये युती करायची की स्वबळावर लढायचे, याबाबत स्थानिक नेत्यांना अधिकार दिले असले तरी राजकीय तणाव वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपचे भास्कर दानवे यांच्याकडे युतीचा औपचारिक प्रस्ताव सादर केला. मात्र, भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया नसल्याने संतापलेल्या खोतकर यांनी कडक इशारा देत म्हटले की, “तुमची स्वबळावर लढण्याची खाज असेल तर ती आम्ही मिटवून टाकू, काही अडचण नाही!”
खोतकर यांनी सांगितले की, मतांची विभागणी टाळण्यासाठीच युतीचा प्रस्ताव भाजपकडे देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० तारखेपर्यंत युतीची वाट पाहण्याचे आणि नंतर स्वबळावर लढण्याचे आदेश दिले आहेत. तरीही भाजपच्या निर्णयाकडे लक्ष देत असल्याचे सांगतानाच, जर त्यांना स्वतंत्र लढायचे असेल तर शिवसेना देखील पूर्ण तयारीने लढेल, असा ठाम विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला. “आम्ही युतीसाठी प्रयत्न करत आहोत, पण भाजपची ‘खाज’ असेल तर ती मिटवण्यात आम्हाला काही हरकत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजपला आव्हान दिले.
मराठवाड्यात स्वबळावर लढण्याची चिन्हे स्पष्ट
मराठवाड्यातील बहुतेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि संतोष बांगर यांनी यापूर्वीच आपल्या मतदारसंघांमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. परभणीतील पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही कालच स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. एकूणच, मराठवाड्यातील स्थानिक निवडणुकीत महायुतीतील दोन्ही पक्ष वेगळे लढणार असल्याचे दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी खोतकर यांनी भाजपचे भास्कर पाटील दानवे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव दिला होता. दानवे यांनी मात्र, “प्रस्ताव प्राप्त झाला आहे, वरिष्ठ नेत्यांचा निर्णय घडल्यानंतर शिवसेनेला कळवू,” असे सांगून तो प्रलंबित ठेवला. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल हे स्वबळावर लढण्याच्या बाजूने आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्याचा राग त्यांच्या मनात अजूनही आहे. यामुळे पहिल्याच महापालिका निवडणुकीत खोतकर यांना धक्का देण्यासाठी दानवे आणि गोरंट्याल सज्ज झाले आहेत.
भाजपकडून महापौरपदाचा दावा
महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असा छातीठोक दावा कैलास गोरंट्याल करत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. खोतकर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी पुन्हा एकदा “खाज असेल तर मिटवू” असा थेट इशारा दिला. मतविभाजन टाळण्यासाठी युतीचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच, स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना तयार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….