धनोडा येथे पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त ; उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांचा दणका
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :
सिंघम म्हणून नावारूपाला आलेले उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन (आयपीएस) यांनी धनोडा येथे गुटख्यावर आज सायंकाळी मोठी कारवाई केली. धनोडा येथील गुटका माफिया प्रवीण हंसलाल जयस्वाल यांच्या किराणा दुकानावर धाड टाकून अंदाजे पाच लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला. अनुराग जैन यांच्या पथकाने साधारणतः महिनाभरापूर्वी प्रवीण जयस्वाल यांच्या घरावर धाड टाकून गुटखा साठा जप्त केला होता. त्यानंतर आज पुन्हा जयस्वाल यांच्याकडे साठवलेल्या गुटखा साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली. प्रवीण जयस्वाल यांच्याकडे गुटख्याची ची अवैध साठवणूक व विक्री होत असल्याची माहिती गोपनीय बातमीदारा कडून मिळाल्यानंतर अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पथकाने धनोडा येथे जयस्वाल यांच्या किराणा दुकानावर धाड टाकली. या कारवाईत विमल, नजर व अन्य प्रतिबंधित असलेला सुगंधी तंबाखू गुटखा आढळून आला.या साठ्याची अंदाजे किंमत पाच लाखाच्या घरात आहे. प्रतिबंधित गुटखा धनोडा येथे आर्णी येथील गुटखा माफिया कडून पुरविण्यात येत असल्याचे कळते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..