तहसीलदारांचा तो आदेश उपविभागीय अधिकारी पुसद यांनी केला रद्द ; संचार बंदी 31 जुलै पर्यंत लागू राहणार कोणतीही सूट मिळणार नाही
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
कोरोना विषाणू चा प्रभाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन(संचारबंदी) जाहीर केली आहे. परंतु दिनांक29 जुलै 2020 च्या आदेशानुसार तहसीलदार पुसद दिग्रस यांनी दिनांक 30 जुलै आणि 31 जुलै रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान किराणा भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूचे दुकान खुली करण्याची शिथिलता दिली होती परंतु पुसद दिग्रस तालुक्यातील शहरातील कोरोना विषाणूच्या फैलावा बाबतची परिस्थिती लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून वरील तहसीलदार यांचा आदेश डॉ.व्यंकट राठोड उपविभागीय अधिकारी पुसद यांनी 30 जुलै 2020 च्या आदेशानुसार रद्द केला आहे.
जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे 28 जुलै चे आदेशातील अटी व शर्तीनुसार पुसद उपविभागातील पुसद दिग्रस शहर व शहरालगतच्या परिसर येथे 31जुलै पर्यंत संचारबंदी लागू राहील असेही या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी पुसद यांनी कळविले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….