अनुशासनानेच कोरोनाला रोखता येईल- डॉ अविनाश गावंडे
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद
देशात मागील ४ महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सद्या तरी निश्चित औषध नाही. मात्र जीवनाला काही अनुशासन लावून दिल्यास कोरोनाला निश्चितच रोखता येईल अश्या आशयाचे मार्गदर्शन नागपूर च्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकल सुप्रीटेंडन्ट तथा नागपूर कोरोना टास्क फोर्स चे सदस्य’डॉ अविनाश गावंडे यांंनी केले.पुसद अर्बन कॉ ऑप बँकेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या संकल्पनेतून कोविड १९ अद्यावत माहिती ,जबाबदाऱ्या व उपाय योजना या विषयावरच आयोजित वेबिनारमध्ये प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.या वेबिनारला १००० पॅनलिस्ट व पार्टीसिपेंट तसेच सुमारे ४हजार लोकांनी शरद मैंद फेस बुक लाईव्ह पेजवर बघितले हे येथे उल्लेखनीय.
डॉ गावंडे पुढे म्हणाले की
सोशल डिस्टनसिंग,सॅनिटायझर व मास्क वापर, प्रतिकारशक्ती वाढविणे ,नियमित व्यायाम ,योगा, संतुलित आहार याबाबींना सद्या जीवनाचे अविभाज्य घटक बनवून घ्या.तर कोरोना चा प्रभाव संपेपर्यंत शक्यतो समुह भेट व प्रवास टाळण्याचे त्यांनी आवाहन केले.लोकडाऊन हा कायमस्वरूपी उपाय नसला तरी प्रसाराचे प्रमाण खुप कमी झाले.परंतु लोकडाऊन नंतर लोक बे फिकीर होऊन फिरत असल्याने रुग्ण संख्या वाढत आहे.शाळा बंद असल्याने पालकांनी पाल्यांना व कुटुंबातील सदस्यांसाठी जास्त वेळ देऊन त्यांना समजून घेण्याचेही भावनिक आवाहन त्यांनी केले.तालुका पातळीवर रुग्ण संख्या वाढत असल्याने वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. प्रश्नाना उत्तर देतांना नोटांतूनही कोरोना पसरण्याची शक्यता पाहता खबरदारी घ्या तसेच बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना झाल्याची माहिती उपलब्ध नसल्याचे, निरनिराळे काढे घेतल्याने नुकसान नसल्याचे त्यांनी सांगितले..
प्रास्ताविकात शरद मैंद यांनी सोशल मिडियावरील विरोधाभासी माहितीमुळे सर्वसामान्यांना योग्य माहिती मिळावी या हेतूने वेबिनार आयोजित केल्याचे सांगितले.यावेळी वेबिनार अध्यक्ष खासदार भावना गवळी तसेच प्रमुख अतिथी आमदार इंद्रनील नाईक, आमदार एड.निलय नाईक,आमदार डॉ वजाहत मिर्झा,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल प्रदेश अध्यक्ष तथा म.गो.बार कौन्सिल चे सदस्य एड आशिष देशमुख, आयएमए पुसद चे माजी अध्यक्ष डॉ अकिल मेमन,विद्यमान अध्यक्ष डॉ संजय भांगडे चेम्बर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुरज डुब्बेवार ,पुसद नप स्थायी समिती सदस्य एड उमाकांत पापीनवार यांनी कोरोना पोजिटिव्ह रुग्णांच्या होमकोरेटिंन व खाजगी कोविड सेंटर बाबत सल्लामसलत करीत शंका निरसन करून घेतले.तर आमदार मदन येरावार,आमदार अशोक उईके,आमदार नामदेव ससाणे सहभागी झाले होते. बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा यांनी आभार प्रदर्शन तर संचालक ललीत सेता यांनी संचालन केले