निकालाची प्रतिक्षा संपली : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी ते मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर औरंगाबाद मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी ते मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी उद्या दिनांक 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे निकाल पाहण्यासाठी मंडळाने अधिकृत तीन संकेतस्थळांचे प्रगटन केले आहे.
www.maharesult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादन केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत म्हणजेच प्रिंटआऊट घेता येणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….