११ हजार भरा अन् ग्रामपंचायतीवर प्रशासक व्हा ; चौफेर टीकेनंतर राष्ट्रवादीनं वादग्रस्त पत्र मागे घेतले
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोरोना साथीचे निमित्त करून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडीने घेतला आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसने यासाठी प्रत्येक इच्छुकांकडून अकरा हजार रुपये वसूल करण्याचा ठराव केला होता. यावर टीका झाल्यावर अखेर तो मागे घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतीच्या इच्छुकांकडून ही रक्कम वसूल केली जाणार होती. राज्यातील जुलै आणि डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हापातळीवर दिले गेले आहेत. पुणे जिल्हा राष्ट्रवादीने ज्या कार्यकर्त्यांना प्रशासक व्हायचे आहे, त्यांनी ११ हजार रुपये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यावर जमा करावे असे आदेश दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी यासंदर्भात एक पत्रक सर्व तालुका अध्यक्षांना दिलं होतं.
एखाद्याला प्रशासक होण्याची इच्छा असेल तर त्याने अकरा हजार रुपये भरावे, असे आदेश या पत्रात होते. मात्र, या आदेशावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने दुकानदारी सुरू केल्याची टीका केली. प्रामाणिक कार्यकर्त्यांनीही त्याला विरोध केला. त्यामुळे हा ठराव मागे घेण्यात आला आहे.
याबाबत भाजपाचे नेते निलेश राणे यांनीही ट्विट करुन राष्ट्रवादीवर टीका केली आहे. काही पक्ष मिळेल तिथून पैसे खायला विसरत नाही, ११ हजार द्या आणि प्रशासक व्हा, जो पैसे देऊन प्रशासक झालाय तो पैसे कमवायला हातपाय तर मारणारच आणि स्वत:चच चालवणार, पक्षाचे कार्यकर्ते प्रशासक झाले की गावाची वाट लावणार असा आरोप त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..